महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरडया घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय. गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला आले पण शेतक-यांच्या संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध महाज्योतीला १५०० कोटींचा निधी; इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी ६३ वसतिगृहे
महाज्योती संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, याच महिन्यात १५०० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यात इतर मागास वर्गासाठी (ओबीसीं) ६३ वसतिगृहे तयार केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकारीच जबाबदार १० ऑक्टोबरचा मोर्चा रद्द करावा; मुख्यमंत्र्यांची ओबीसी शिष्टमंडळाला विनंती
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्याचबरोबर, राज्यातील पूरस्थिती …
Read More »राष्ट्रवादीच्या राज राजापूरकर यांचा आरोप, फडणवीसांची ओबीसी आरक्षणावर दुटप्पी भूमिका ओबीसी बैठकीतून डावलल्याचा आरोप
ओबीसी आरक्षणाच्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरदचंद्र पवार पक्ष) हेतुपुरस्सर डावलण्यात आले, असा घणाघाती आरोप पक्षाचे नेते राज राजापूरकर यांनी आज केला. एका बाजूला बैठकीचे निमंत्रण न देता चर्चेपासून दूर ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार पक्ष ओबीसींच्या प्रश्नावर …
Read More »खासदार नरेश मस्के यांचा इशारा, तर गणेश नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडीओ प्रदर्शित करू शिवसेनेचा भाजपाच्या गणेश नाईक यांना कडक इशारा
आमच्या नेत्यांना गणेश नाईक तुम्ही नालायक म्हणत अहात. मात्र नालायकपणाची एक व्याख्या असते. तुमच्या नालायकपणाचे व्हिडीओ नवी मुंबईच्या गल्लीत पूर्वी फिरत होते. नंतर ते व्हिडीओ फेसबुक आणि व्हाट्स अपच्या माध्यमातून महाराष्ट्रात गाजले. भविष्यात हेच व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित केले जातील, असा कडक शब्दात शिवसेनेने एका पत्रकार परिषदेत गणेश नाईक …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा निर्धार, १० ऑक्टोबरचा ओबीसी महामोर्चा होणारच राज्य सरकारने ओबीसी संघटनाच्या बोलावलेल्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्याने महामोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ओबीसी संघटना ठाम
राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे.हा शासन निर्णय रद्द करावा तसेच २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या दोन मागण्या आज ओबीसी संघटनांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी …
Read More »रामदास कदम यांचा इशारा, बाळासाहेबांच्या पार्थिव प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून मागणी करणार तसेच अनिल परब यांना न्यायालयात खेचणार
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावरून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते अनिल परब यांनीही पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावरून रामदास कदम यांनी अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या विरोधात अब्रु नुकसान भरपाईचा दावा दाखल …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा घोषणा, २०२६ हे पदभरतीचे वर्ष असणार राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत रिक्त असलेल्या दिड लाख रिक्त जागांपैकी ७५ हजार रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०२६ हे वर्ष पदभरतीचे वर्ष असणार असल्याचे जाहिर करून राज्यातील जनतेला पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या …
Read More »रामदास कदम यांच्या त्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर शिव्या देणाऱ्यांपेक्षा आर्शीवाद देणारे हात महत्वाचे
नुकत्याच झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांच्या पक्षाचे नेते रामदास कदम यांनी नेहमीप्रमाणे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून गंभीर आरोप केला होता. त्या वक्तव्याला काही प्रसारमाध्यमातून प्रसिद्धीही चांगली मिळाली. मात्र रामदास कदम यांच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव राज्यातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांचादेखील लवकरच नामविस्तार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची …
Read More »
Marathi e-Batmya