राजकारण

राजन तेली आणि दीपक आबा साळूंखे पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश शिवसेना उबाठातील प्रवेशाने दिपक केसरकर आणि शहाजीबापू पाटील यांच्या जागा धोक्यात

काही दिवसांपूर्वी जळगांवमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यावेळी भाजपाला मोठा हादरा बसला. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करू नये यासाठी मनधरणीही केली. मात्र आज कोकणातील भाजपाचे नेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक राजन तेली यांनी आणि सांगोल्यातील काय झाडी काय डोंगार फेम शहाजी बाजू पाटील …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, शरद पवार दुबईमध्ये दाऊदला भेटले कॅलिफोर्निया आणि दाऊदला भेटण्यासाठी केंद्र सरकारची पवारांना परवानगी होती का ?

शरद पवार १९८८-९१ या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९८८-९१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट

विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व …

Read More »

प्रविण दरेकर यांचे आव्हान, धमक असल्यास जरांगेंनी निवडणूक लढवावी देवेंद्र फडणवीस यांच्या नावची काविळ

सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटल्या सारखे वाटताहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल असे वाटले होते. मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसताहेत हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे जरांगे यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल …

Read More »

बच्चू कडू यांचा सवाल, तुम्ही कसले परिवर्तन आणणार… तिसऱ्या आघाडीचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवाल करत तिसऱ्या आघाडीचे आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करत परिवर्तनाचा अधिकार महायुतीला नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला …

Read More »

शरद पवार यांच्या संकेताने महाविकास आघाडीत चलबिचल संजय राऊत म्हणाले… जयंत पाटील यांचे नाव घेताना खास विशेषणांचा उल्लेख

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. त्यात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार असल्याची अधिकृत घोषणा नसली तरी अप्रत्यक्ष घोषणा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना आव्हान देत तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहिर करा असे आव्हान …

Read More »

नांदेड पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण तर एमआयएमकडून इम्तियाज जलील स्व. वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाली आहे. विधानसभा निवडणूकीबरोबरच राज्यातील लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणूकही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभा सदस्य राहिलेले वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी काँग्रेसकडून जाहिर करण्यात आली आहे. नांदेडचे माजी काँग्रेस …

Read More »

सुधांशू त्रिवेदी यांचा आशावाद, महायुती सरकारच्या विकास कामांची पावती मतदार देणार वक्फ मुद्यावरून विरोधक गप्प का?

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी काम करत आहे. भाजपा सरकारने देशात- राज्यात विकासाचा मोठा टप्पा पार केल्याने भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने ५०० बिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. राज्यात महायुती सरकारने केलेल्या विकास कामांची पावती मतदार आगामी …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, लाडकी बहीण’ च्या जाहिरातबाजीवर युतीकडून २०० कोटींची उधळपट्टी भगिनींना मदत करताना जाहिरातबाजी व चमकोगिरीची गरज काय?

काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु टेंडर घ्या व कमिशन द्या या भाजपा महायुती सरकारच्या धोरणानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर भाजपा युती सरकारने २०० कोटींची उधळपट्टी केली असल्याचा …

Read More »

अधिकाऱ्यांच्या बदल्याने नाराज मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, परत येईन असे वाटत नाही का ? एकदमच मुख्यमंत्री कार्यालयातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांची साधला संवाद

राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता १५ ऑक्टोंबर रोजी जाहिर केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली. मात्र त्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने केल्या. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातील एकदम या पाच ते सहा सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने नाराज झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »