राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील ७५ टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरळपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सुट्टीवर गेले आहेत पण काँग्रेस पक्ष जनतेला न्याय देण्यासाठी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असून प्रत्येक …
Read More »डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्या भगेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील यांची मागणी
मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड यांनी डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आणि ती पायदळी तुडवली त्यामुळे भगेंद्र आव्हाडांवर राज्यसरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याला जितेंद्र आव्हाड …
Read More »विधान परिषद शिक्षक, पदवीधर आणि राज्यसभेसाठी २५ आणि २६ जूनला मतदान विधान परिषदेच्या चार जागांसाठी तर राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत काही सूचना असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दि.३० मे …
Read More »जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध मनुस्मृती जाळल्याने मरत नाही, तर कृतीने ती संपेल
राष्ट्रवादीचे( शरद पवार ) नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडले. त्यांच्या या कृतीचा वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर निषेध केला. वंचित बहुजन आघाडीने आपल्या एक्सवर पुढे म्हणाले की, …
Read More »राहुल गांधी यांनी उडविली पंतप्रधान मोदी यांच्या महात्मा गांधी यांच्यावरील त्या वक्तव्याची टिंगल महात्मा गांधी यांना जाणून घेण्यासाठी एन्टायर पॉलिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना पिक्चर बघण्याची गरज
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचाट वक्तव्यावरून सातत्याने कोणता ना कोणता तरी वाद निर्माण होत आहे. त्यातच नुकत्याच एका खाजगी वृत्त वाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी यांना कोणी ओळखत नव्हते असे धांदात बुध्दीची किव करणारे वक्तव्य …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पैसे वाटल्याच्या लेखातून आरोपावरून नोटीस बजावली
काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारच्या सामना या दैनिकात लेख लिहून लोकसभा निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगणित पैसा खर्च केल्याचा आरोप त्या लेखातून केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेत चुकीची प्रतिमा निर्माण झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवित एकतर …
Read More »लोकसभा निवडणूकीचा प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी चिंतनासाठी कन्याकुमारीत ३० तारखेपासून ४ जूनच्या संध्याकाळ पर्यंत करणार चिंतन
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवस आध्यात्मिक आराम घेणार आहेत. ४ जून रोजी मतदानाच्या निकालापूर्वी चिंतन करण्यासाठी ते तामिळनाडूमधील कन्याकुमारीला भेट देणार असून तेथील विवेकानंद मेमोरियल मध्ये ध्यान साधना करणार असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. ३० मे रोजी सायंकाळपासून ते १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ते ध्यान मंडपममध्ये ध्यान …
Read More »पंतप्रधान मोदी उतरलेल्या हॉटेलचे थकीत बीलः वसुलीसाठी कायदेशीर मार्ग वापरणार कर्नाटक सरकारने अखेर दाखविली बिल भरण्याची तयारी
५० वर्षाच्या टायगर प्रोजेक्टच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हैसुर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरले होते. मात्र एक वर्ष झाला तरी पंतप्रधान मोदी हे उतरलेल्या हॉटेलचे बिल सरकारकडून दिले गेले नाही. त्यामुळे या हॉटेलच्या प्रशासनाने यासंदर्भात कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा देताच पंतप्रधान मोदी यांचे बिल कर्नाटक सरकारने भरण्याची …
Read More »राज्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी प्रदेश काँग्रेसच्या विभागनिहाय समित्या काँग्रेसच्या समित्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून विभागीय आयुक्तांना निवदेन देणार
राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या असून रोजगारही मिळत नाहीत. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारला दुष्काळाची चिंता नाही. जनता दुष्काळाने होरपळ असताना महायुती राजकीय साठमारीत व्यस्त आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापन केली …
Read More »अरविंद केजरीवाल यांच्या जामिन मुदतवाढ प्रकरणी याचिका लिंस्टींग करण्यास न्यायालयाचा नकार सुट्टीकालीन द्विसदस्यीय खंडपीठाचा निर्णय, सरन्यायाधीशांच्या बेंचकडे करा
मद्य धोरण ‘घोटाळा’शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनासाठी सात दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी दाखल केलेल्या अर्जाचा समावेश लिस्टींग मध्ये करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नकार दिला. न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि के.व्ही. विश्वनाथन यांनी २८ मे रोजी सांगितले की, ते न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने आधीच निकालासाठी राखून ठेवलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya