राजकारण

पृथ्वीराज चव्हाण यांची टीका, पूर्णपणे विसरता येणारा अर्थसंकल्प…

देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केला. या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक टीका करताना म्हणाले की, सादर केलेला अर्थसंकल्प हा अत्यंत निराशाजनक आणि पूर्णपणे विसरता येणारा अर्थसंकल्प म्हणावा लागेल हि प्रतिक्रिया विरोधक आहोत म्हणून देत नाही …

Read More »

भाजपाचे आता “गाव चलो अभियान”

भाजपातर्फे ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, …

Read More »

हेमंत सोरेन यांना ५ दिवसाची ईडी कोठडी, चंम्पाई सोरेन नवे मुख्यमंत्री

झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ८.५ एकर जमिन घोटाळ्या प्रकरणी आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी यांना ईडीने अटक केल्यानंतर रांची येथील ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची कोठडी विशेष न्यायालयाने सुनावली. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय हेमंत सोरेन यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, झेंडा राहिला बाजूला नॅपकिन फडकाविणारेच जास्त

खरं तर आज रायगडमध्ये आलोय ते जनसंवाद नव्हे तर माझ्या कुटुंबातील लोकांशी संवाद साधायला आलो आहे. त्यामुळे जनसंवाद नव्हे तर कुटुंब संवाद असे म्हणायला हरकत नाही. रायगड ही सैनिकांची आणि वार करणाऱ्या वारकऱ्यांची भूमी असून गद्दारांना टकमक टोक दाखविणारे ही याच रायगड जिल्ह्यातच असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, पाणी टंचाईवरील उपाययोजनेसाठी लहान बंधाऱ्यांना प्राधान्य

राज्यात पिण्याच्या पाण्यासंदर्भातील टंचाईवर मात करण्यासाठी छोट्या बंधाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. राज्यभरात छोट्या बंधाऱ्यांसाठी जागेची निश्चिती करण्यात यावी, असे निर्देश देतानाच सातारा जिल्ह्यातील कोयना धरण बुडीत क्षेत्रातील २५ बुडीत बंधाऱ्यांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. यामुळे महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील गावांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर उपाययोजना करणे शक्य होईल, असे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात…

पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी पी.एम. विश्वकर्मा सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतही अग्रेसर राहील, असा विश्वास आहे. या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावे. या योजनेअंतर्गत २०२८ पर्यंत तीन लाख कारागिरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचे …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, निर्मला सीतारामण यांचा अर्थसंकल्प नव्हे तर ‘राष्ट्रीय जुमला संकल्प’

मोदी सरकारने मागील १० वर्षात केवळ मोठ-मोठ्या घोषणा व वल्गना केल्या आहेत, त्या प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत म्हणूनच त्याला जुमलेबाजी म्हणतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना शेवटची जुमलेबाजी करण्याची आज संधी मिळाली, आता पुन्हा अशी संधी मिळणार नाही कारण जनता भाजपाला सत्तेत येऊ देणार नाही. निर्मला सीतारामण यांनी आज सादर केलेला …

Read More »

ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपामध्ये

मंडणगड मतदारसंघाचे सलग २५ वर्षे प्रतिनिधीत्व केलेले उबाठा गटातील माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार ,राष्ट्रवादी चे नेते व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी संचालक प्रकाश शिगवण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

नाना पटोले यांची टीका, जुमलेबाज भाजपा सरकारचा आणखी एक जुमेलबाज अर्थसंकल्प

केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेहमीप्रमाणे मोठे मोठे आकडे सांगून काहीतरी भव्य केल्याचा आभास निर्माण केला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, मध्यम वर्गासह सामान्य जनतेची या अंतरिम अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे. सर्वसामान्यांना लुटायचे आणि श्रीमंतांना वाटायचे हेच …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ४०४ ची घोषणा करता मग नितीशकुमार सोबत कशाला

अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन नुकतेच झाले. मंदिरातील राम हा काही एकट्या मोदी आणि भाजपावाल्यांचा राम नाही. तर या भारतात राहणाऱ्या करोडो राम भक्तांचा राम आहे. जसा तो तुमचा आहे तसा तो माझाही आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाला आमंत्रण आले न आल्याची वाट पाह्यली नाही. पण मी नाशिकमधील काळाराम मंदिरातील रामाची पूजा …

Read More »