राजकारण

आता जलविद्युत प्रकल्पातही खाजगी भागिदारीचे धोरणः राज्य सरकारचा निर्णय मोठी खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येण्याचा राज्य सरकारचा दावा

सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी (Pumped Storage Projects) स्वतंत्र धोरण राबवून मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत ही ऊर्जा क्षमता २५ हजार मेगावॅटपर्यंत …

Read More »

राज्य सरकारचा निर्धार; मुलींना करणार लखपती राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर …

Read More »

सत्तेतील शंभर दिवसः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे जनतेला पत्रातून वचन कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड...

रोजगार, सर्व समाजघटकांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचे उद्दीष्ट असून येत्या काळात या सर्व विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महायुतीत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला आज १० ऑक्टोबर रोजी …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, ‘शासन आपल्या दारी आणि लोकं देवाघरी’ अशी शिंदे सरकारची कार्यशैली शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही चार्टर्ड विमानवाल्याचे सरकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च करण्यात आला. रिक्षावाले मुख्यमंत्री अल्पावधीत चार्टर्डवाले झाले आहेत. २०१५ च्या दावोस दौऱ्यावर ६२ लाख २८ हजार रुपये खर्च झाला होता तोच जानेवारी २०२३ च्या दौऱ्यावर ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असून …

Read More »

राज ठाकरे यांचा अंतिम इशारा, … अन्यथा टोल नाके जाळून टाकू टोलचा पैसा जातो कोणाच्या खिशात

राज्यातील टोलच्या विरोधातील आंदोलनप्रश्नी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पुकारलेले उपोषणाचे हत्यार मागे घेत दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील टोल बंद करा अन्यथा आगामी काळात टोल नाके जाळून टाकू असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील पत्रकार परिषदेत दिला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केवळ कमर्शियल गाड्यांनाच टोल आकारणी होत …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा भाजपावर निशाणा, आमदार विकत घ्यायला पैसै, मात्र रूग्णालयासाठी पैसे नाहीत नांदेड येथील रूग्णालयातील मृत्यूवरून सरकारला करून दिली आठवण

राज्यातील दोन तीन जिल्ह्यात मृत्यू संख्या वाढल्याचे दिसत होत त्याला काही कारण असू शकतात पण यात राजकारण न करता मार्ग काढावे लागतील. हेच डीन, डॉक्टर, नर्स असताना कोरोना काळात जगाने आपल कौतुक केले. हे उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. काय कमी राहत आहे याची कारणं शोधावे लागेल असे युवासेना नेते आदित्य …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून “या” तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांचा समावेश

राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची आज बैठक झाली. या बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकासाच्या २८६.६८ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास, श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित १६३ कोटी आणि श्री क्षेत्र सप्तश्रृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या ८१.८६ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, भाजपाचे हुकुमशाही सरकार हाकलून लावणे हेच उदिष्ट तरुणांच्या जीवनाशी खेळणाऱ्या ड्रग माफियांविरोधात ‘नाशिक बचाव’ आंदोलन करणार

इंग्रजांनी देशाला लुटले त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आज देशाला लुटत आहे. भाजपा सरकारने रेल्वे विकली, विमानतळे विकली, वीज वितरण व्यवस्था विकली तसेच अनेक सार्वजनिक उपक्रमही विकले. देशाची संपत्ती विकून मोदी सरकार कारभार करत आहे. लोकशाही व्यवस्था, संविधान व न्याय व्यवस्थेलाही संपवण्याचा प्रयत्न सुरु असून देशाला लुटणाऱ्या जगातील बलाढ्य इंग्रज सत्तेला …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? ट्रिपल इंजिन सरकार विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष

विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर तोल कशाचा घेता असा …

Read More »

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक आयोगाकडून जाहिर १३ ऑक्टोंबरपासून प्रक्रियेला सुरुवात तर ३ डिसेंबरला मतमोजणी

देशातील विशेषतः उत्तर भारतातील चार आणि ईशान्येकडील एका राज्यातील विधानसभांचा कालावधी पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केले. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणूका होत असल्याने हाच कल पुढील लोकसभा निवडणूकीत कायम राखला जाईल अशी अटकळ बांधली जात …

Read More »