राजकारण

राजस्थानात आता भाजपाकडून व्हाया शिंदे राजेंद्रसिंह गुडा प्रयोग वसुंधरा राजे यांच्याऐवजी आता राजेंद्र सिंह गुढा यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा

राजस्थानमध्ये काँग्रेसला भगदाड पाडून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या माध्यमातून भाजपा आघाडीचे सरकार बसविण्याचा प्रयत्न भाजपाच्या अंगाशी आला. त्यामुळे वर्षाअखेर राजस्थान विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना शह देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून राजेंद्रसिंह गुडा यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून हालचाली सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. …

Read More »

अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची …

Read More »

ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण द्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण द्यायला पाहिजे. केंद्र सरकारने १० टक्के मराठा समाजाला अर्थिक मागास प्रवर्ग म्हणून आरक्षण देताना ५० टक्के अट ओलांडली आहे. तर मग मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण देण्यात काय अडचण आहे. असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पुणे काँग्रेस …

Read More »

काका पुतण्यात संघर्ष: शरद पवार गटाने ४० आमदारांना…. अजित पवार गटाचे दावे फेटाळले -निवडणूक आयोगाला पाठविले ई-मेलद्वारे पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता.यावर शरद पवार गटाने अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांना अपात्र करण्याची …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभारला सहाव्या दिवशीही काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला जनतेचा दांडगा प्रतिसाद

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारने देशात सुईपासून रॉकेट पर्यंतचा विकास केला. चंद्रावर चांद्रयान-३ सोडले त्या इस्रोची स्थापनासुद्धा काँग्रेस सरकारच्या काळातच झाली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेवर आले पण या सरकारने मागील ९ वर्षात नवीन काहीच उभे केले नाही. उलट काँग्रेस सरकारने उभे केलेल्या सर्व बँका, रेल्वे, विमानतळे, विमा कंपन्या विकून टाकल्या. देश …

Read More »

भाजपा झाली चिंतीत, ४० टक्क्याच्या रिपोर्ट कार्ड वाल्यांना घरचा रस्ता अजित पवार यांच्या येण्याने भाजपाची गोची वाढली, तर एकनाथ शिंदेंना तुमचं तुम्हीच बघा म्हणण्याच्या तयारीत

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे २०२४ च्या निवडणूकीतही आपणच पंतप्रधान पदी परत येणार असल्याची घोषणा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना केली. तसेच लोकसभा निवडणूकीत जागा वाढविण्यासाठी लहान-मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुट पाडण्याचे कामही सुरु करण्यात आले. परंतु आता हेच फुट पाडणे भाजपाच्या …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, सरकार आपल्या दारी दुष्काळ उरावरी…. अहमद नगरच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली टीका

काल मी असं ऐकलं की वीमा कंपन्यांना २५ टक्के रक्कम देता येतेय का ते पाहा, असं सरकारने सांगितलं. पण २५ टक्के कुठून काढलंत आपण. १०० टक्के नुकसान झाल्याचं दिसतंय, तिथे पंचनामे कधी करणार? पाऊस लागला तर सरकार म्हणेल की पाऊसच पाऊस चहुकडे. अशा परिस्थितीत सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ …

Read More »

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधींची लढाई देश, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी – थोरात

भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारपरिषदा, भारत जोडो पद यात्रा आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकारिषदा घेऊन महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट करणा-या मोदी सरकारची पोलखोल केली व त्यानंतर पदयात्रा काढून सभा घेतल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला बहुसंख्य हिंदु समाज मोदी व भाजपाविरोधात, भाजपा उरला केवळ गुजरात, उत्तर प्रदेशात - कुमार केतकर

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी आजच्या दिवशी २०२२ साली कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर पदयात्रा काढून भारत जोडण्याचे काम केले. केंद्रातील मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशात केवळ सामाजिक भेदभाव निर्माण करुन देशातील वातावरण गढूळ केले आणि महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट केली आहे. या भिती व दहशतीच्या वातावरणाला …

Read More »