राजकारण

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे का ? शेतकरी आत्महत्येवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर निशाणा

राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तर तब्बल ४४ दिवस ओढ दिली. परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे, याची साधी जाणीवही नाही. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना टोकाची भूमिका घेण्यास भाग पडल्यास त्याची …

Read More »

नाना पटोले यांची खोचक टीका, नरेंद्र मोदींच्या राज्यात एक माणूस…. भाजपाला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला आणा तुम्हाला न्याय देऊ

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची लुट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम सुरु आहे. मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि …

Read More »

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी – नाना पटोले मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव

मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव …

Read More »

आम्ही आरक्षण दिलं तरी ते कायद्याच्या चौकटीवर टीकलं पाहिजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ओबीसी समाजावर परिणाम होण्याची

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. तर, दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर ओबीसी समाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वक्तव्य केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो. सर्वोच्च …

Read More »

टीडीपीकडून आंध्र प्रदेश बंदची हाक चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (९ सप्टेंबर) सीआयडीने नंदयाल येथून अटक

आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (९ सप्टेंबर) सीआयडीने नंदयाल येथून अटक केली होती. एका दिवसानंतर, चंद्राबाबू नायडू यांना रविवारी (१० सप्टेंबर) सकाळी विजयवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एका निवेदनात …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचालींना वेग १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता

गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचाली होण्याची दाट शक्यता आहे. आणखी १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राष्ट्रवादीचे दोन नेते भाजपच्या श्रेष्ठींना दिल्लीत अलीकडेच भेटले. तुम्ही तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत एकत्र बसा, मंत्रिपदांचे वाटप आणि नावे निश्चित करा आणि पुन्हा दिल्लीला या असे त्यांना भाजप श्रेष्ठींनी सांगितले. …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा संधी दिली जाणार का? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं काय होणार, त्यांना पक्षात पु्न्हा संधी दिली जाणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय नेते पक्षउभारणीसाठी प्रयत्न …

Read More »

अजित पवार यांचे आव्हान, महायुतीत सहभागी व्हा पत्र खोटं निघालं तर संन्यास घेईन… लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर बीड येथे झालेल्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी बीडऐवजी कोल्हापूरात हसन मुश्रीफ यांनी उत्तरदायित्व सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अजित पवार आणि काही लोकांनी वेगळा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आमच्यावर कसला दबाव होता अशी …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात रंगला शाब्दिक कलगीतुरा छत्रपतींचे पुरावे चालत नाही अन् निझामाचे चालतात....

मराठा आरक्षणप्रश्नी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह राज्यातील कुणबी समाजातील सर्वांना मराठा आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी केली. त्यावर राज्य सरकारने निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी दाखले देण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला याच मुद्यावरून जालन्यातील आंदोलन आणखी उग्र करत वंशावळीचा मुद्दा काढून टाकण्याची मागणीही करण्यात …

Read More »

शरद पवार यांचा नरेंद्र मोदींना सवाल, आता गेट वे इंडियाला काय म्हणायचं? इंडिया-भारत वादावर आणि जी २० परिषदेवरुन साधला निशाणा

मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक संपन्न होत असतानाच केंद्रीतील मोदी सरकारने संसदेचं अधिवेशन बोलवलं. त्यातच जी २० या आंतरराष्ट्रीय नेत्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने मोदी सरकारने अचानक इंडिया या शब्दाऐवजी भारत शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामवरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी …

Read More »