राजकारण

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा राष्ट्रगीत अवमान प्रकरणात समन्स व कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. राष्ट्रगीत अवमान प्रकरणी त्यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी करुन कायदेशीर प्रकिया सुरु केली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली. याबाबत २५ मार्च रोजी पुढील कार्यवाही होईल. ममता बॅनर्जी यांच्यातर्फे माजी …

Read More »

युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा पंतप्रधानांना या देशातील निवडणूका महत्त्वाच्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणा; आठ दिवसापूर्वीच्या ट्वीटची जयंत पाटील यांनी करुन दिली आठवण

शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा असे पंतप्रधानांना ट्वीट करुन सांगितले होते. परंतु त्यांना उत्तर प्रदेश आणि इतर निवडणूकांपेक्षा या देशात काहीच महत्वाचे वाटत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. माध्यमांनी युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले असून भारतातील विद्यार्थी अडकले असल्याचे …

Read More »

मराठा समाजासाठी आता स्वतंत्र मागासवर्ग आयोगाच्या स्थापनेसह “या” गोष्टी करणार मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा …

Read More »

महाविकास आघाडीची पोलिसांना खुषखबर: आता पोलीस अंमलदारांची होणार पदोन्नती मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उप निरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्याचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई, …

Read More »

खुशाल चौकशी करा म्हणणाऱ्या सोमय्यांच्या मुलाची न्यायालयात धाव अटकपूर्व जामीनासाठी केला अर्ज

काही दिवसांपूर्वी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणावर आरोप केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून सोमय्या यांनी ठाकरे सरकारला आव्हान देत ठाकरे सरकारने खुशाल चौकशी करावी आम्ही न्यायालयात जाणार नाही असे ठणकावून सांगितले. मात्र त्यास ७८ तास उलटत नाही तोच सोमय्या …

Read More »

नवाब मलिकांचा राजीनामा मागण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीचे महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केलेली आहे. केंद्र सरकारच्या ह्या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून भाजपाला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय …

Read More »

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन राजीनामा देईपर्यत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार

कथित मनी लॉडरींग आरोपावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्यावरील आरोप सिध्द होईपर्यत त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही असे धोरण महाविकास आघाडीने स्विकारत तसे जाहीरही केले. त्यावर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीवरून भाजपाने आज राज्याभर आंदोलन केले. तसेच राजीनामा घेईपर्यत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा भाजपाच्यावतीने …

Read More »

वकीलांच्या उपस्थितीत नवाब मलिकांच्या चौकशीस न्यायालयाची परवानगी पीएमएलए न्यायालयाने मलिकांच्या तीन मागण्यांना दिली मंजूरी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यत ईडीची कोठडी पीएमएलए न्यायालयाने दिल्यानंतर त्यांना घरचे जेवण मिळावे, तसेच वकीलांच्या उपस्थितीत त्यांची चौकशी करण्यात यावी, घरचे जेवण घेण्यास परवानगी आणि औषधोपचार घेण्यास परवानगी मिळावी याबाबत विनंती अर्ज आज मलिकांचे वकील अमित देसाई यांनी पीएमएलए न्यायालयात एका अर्जान्वये …

Read More »

संजय राऊत म्हणाले, मुंबईत १० पैकी ६ जण हिंदीत बोलतात उत्तर प्रदेशातील प्रचारसभेत राऊतांचे वक्तव्य

राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेने प्रवेश केल्याने मुंबईत मराठीच्या मुद्यावरून शिवसेनेकडून घेण्यात येत असलेल्या भूमिकेत आता थोडासा बदल झाल्याचे दिसून येत असून आज शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि नेते आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी गोरखपूर येथे आले आहेत. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबईत हिंदी …

Read More »

मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का? भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा  महाराष्ट्राचा अपमान असून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ठाकरी बाणा दाखवणार का, असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत …

Read More »