राजकारण

शेलारांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन, “शरद पवारांच्यासमोर झुकू नका तर…” देव, देश धर्मासाठी बोलून नाही, तर करून दाखवा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांशी थेट आर्थिक व्यवहार करणा-या नवाब मलिक यांची मंत्री मंडळातून कालपट्टी करा, देव देश आणि धर्मासाठी आता बोलून नाही तर करून दाखवा, असे जाहीर आवाहन भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांना आज येथे केले. अन्यथा भाजपा आंदोलन अधिक तीव्र करेल, असा इशाराही त्यांनी …

Read More »

…तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणे आहे. देशद्रोही गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा उद्या बुधवार २ मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. …

Read More »

छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले हा महाराष्ट्राचा अपमान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. तथापि, राज्य सरकारला सहजपणे यापूर्वीच मान्य करता येण्यासारख्या मागण्यांसाठी छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. महाविकास आघाडी सरकार किमान या छोट्या आश्वासनांचे पालन करेल आणि छत्रपतींची तसेच मराठा समाजाची …

Read More »

संभाजी राजेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर म्हणाले, आता केंद्राने आरक्षण मिळवून द्यावे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते फळांचा रस घेत सोडले उपोषण

मराठी समाजाच्या विविध मागण्यांप्रश्नी भाजपाचे खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारच्या विरोधात आमरण उपोषणाचा निर्णय घेत मागील तीन दिवस उपोषण सुरु केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही आझाद मैदानावर उपोषण सुरु केले. आज सकाळी संभाजी राजे यांच्या शिष्टमंडळ आणि राज्य सरकारमध्ये चर्चेची फेरी पार पडली. यावेळी राज्य सरकारकडून राजे …

Read More »

लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल फडणवीसांनी महाराष्ट्रात राबवले रश्मी शुक्ला या तर फक्त प्यादं, त्यांना आदेश देणा-या मुख्य सुत्रधारांचा शोध घेतला पाहिजेः अतुल लोंढे

फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण रश्मी शुक्ला या एक प्यादं आहेत त्यांना फोन टॅपिंगचे …

Read More »

शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना राज्यातील भाजपा नेते गप्प कसे? छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींनी जाहीर माफी मागावी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा …

Read More »

उदयनराजें म्हणाले की, राज्यपालांच्या त्या वक्तव्याने… राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया

औरंगाबादेत काल आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रामदास स्वामींशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यात नव्याने वादंग निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर विविधस्तरातून राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १६ वे वंशज छत्रपती उदयन राजे भोसले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून छत्रपती शिवाजी …

Read More »

मोदींचा आंतरराष्ट्रीय प्रभाव घटला ? अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी केंद्राचे चार मंत्री पोलंड-युक्रेन सीमेवरील घटनेनंतर मोदी सरकारचा निर्णय

मागील सात वर्षापासून केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर मोठा दबदबा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन-पोलंड सीमेवर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी अखेर मोदी सरकारमधील चार मंत्र्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा प्रभाव घटला …

Read More »

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारेल ? औरंगाबादेतील समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात केले वक्तव्य

मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. तसेच त्यावेळी शिवाजी महाराज यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी किंवा दादाजो कोंडदेव नव्हते तर तर दस्तुरखुद्द राजमाता जीजाऊ याच होत्या यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, “होय, आमचीही मुले इंग्रजीत शिकली पण घरात…” स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेमुळे माझी मुले मराठीत बोलू लागली

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज आयोजित सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब असताना आमच्यावर टीका झाली की बाळासाहेब मराठी मराठी करतात आणि त्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. होय माझी दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. परंतु त्यावेळी मला बाळासाहेबांनी बोलावून सांगितले …

Read More »