प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन,ओबीसींसाठी ही निवडणूक महत्वाची तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल

मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुःखु लागल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या छातीत ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. काल सकाळी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अॅजिओप्लास्टी आणि अन्य एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना २४ तासा डॉक्टरांच्या पथकाकडून निरिक्षणाखाली ठेवण्यात आले. आज थोडेसे बरे वाटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रूग्णालयातून एका व्हिडिओ जारी करत त्यांच्या मतदारांना आवाहन केले.

ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या बाजूस एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी, एसटी आरक्षणाच्या क्रिमीलेयरची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा, असे आवाहनही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना, उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला केले आहे.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ जुलैपासून वाहनांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *