रविंद्र वायकर-अमोल किर्तीकर यांना किती मते मिळाली, संजय निरूपम यांचा दावा अमोल किर्तीकरांचा पराभव पोस्टल मतांमुळेच

निवडणूक मतदानात ईव्हीएम मशिन नको म्हणून प्रसिध्द उद्योजक एलोन मस्क यांनी भूमिका मांडल्यानंतर देशांतर्गत लोकसभा निवडणूकीतील विशेषतः मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि भाजपा पुरस्कृत शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या जय-पराजयावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यापार्श्वभूमीवर रविंद्र वायकर यांचे निवडणूक सारथ्य करणारे काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले संजय निरूपम यांनी या निवडणूकीतील नवी माहिती पुढे केली.

संजय निरूपम म्हणाले की, अमोल किर्तीकर यांचा पराभव हा ईव्हीएम मधील मतांमुळे झाला नसून तो पोस्टल बॅलेटमधून मिळालेल्या मतांमुळे झाला असल्याचा दावा केला.

संजय निरूपम यांनी पुढे बोलताना सांगितले की, पोस्टल बॅलेटची मते ही ईव्हीएम मशिनच्या मतांमध्ये गृहीत धरली जात नाहीत. फक्त ईव्हीएम मशिन्सच्या एकून मतांची आणि पोस्टल बॅलेटच्या मतांची फक्त बेरीज केली जाते. ईव्हीएम मशिन्समध्ये अमोल किर्तीकर यांना मिळालेल्या मतांमध्ये रविंद्र वायकर यांना मिळालेल्या मतांपेक्षा एक मत जास्तीचे होते. तर पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरु झाल्यानंतर अमोल किर्तीकर यांना १५०१ मते मिळाली. तर रविंद्र वायकर यांना १५५० मते मिळाली. त्यामुळे रविंद्र वायकर यांना ४८ मते अधिकची मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तसेच कोणत्याही उमेदवाराला फक्त दोन वेळा फेरमोजणीसाठी मागणी करता येते. त्यापेक्षा जास्त नाही असेही यावेळी सांगितले.

संजय निरूपम पुढे बोलताना म्हणाले की, या मतदारसंघाचा निकाल जेव्हापासून जाहिर झालाय. तेव्हापासून शिवसेना उबाठा गटाकडून एकच आरोप करण्यात येत असून रविंद्र वायकर यांना प्रशासनाकडून जिंकून आणले असल्याचा. मात्र उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि त्यास नकार दिला असता तर तुम्ही म्हणू शकला असता की सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करत प्रशासनाच्या माध्यमातून निवडूण आणलं.

याशिवाय संजय निरूपम म्हणाले की, दरम्यान मतमोजणी करताना कोणी मोबाईल आत नेला, मोबाईल नेणारा व्यक्ती कोण होता, याचा तपास झाला पाहिजे. वनराई पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार तो व्यक्ती रविंद्र वायकर यांचा मेव्हुणा होता की अन्य कोण होतं, तसेच तो मोबाईल त्याचा होता की अन्य कोणाचा होता याचा तपास झाला पाहिजे असेही यावेळी सांगितले.

तसेच पुढे बोलताना संजय निरूपम म्हणाले की, ईव्हीएम मशिन मोबाईलवर ऑपरेट होत नाही. तसेच मोबाईलचा वापर करून मशिन लॉक करण्यात आलं. देशातील कोणतंच ईव्हीएम मशिन मोबाईलवर ऑपरेट होत नसताना त्याला ओटीपी कसा आला, ईव्हीएम मशिन मतमोजणीला अनलॉक करताना तेथील अधिकाऱ्यांना मेसेज येतात. त्यामुळे रविंद्र वायकर यांच्या विरोधात हा सरळसरळ अपप्रचार होत असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *