युपीएससीसाठी एससीच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या योजनेतील ‘त्या’ अटी रद्द बार्टी ने घातलेल्या जाचक अटींमुळे विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती नाराजी

मुंबई : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा (युपीएससी प्रिलीम) उत्तीर्ण झालेल्या मुख्यपरीक्षा २०२० साठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या एक रकमी अर्थसहाय्य योजने साठी बार्टीने घातलेल्या जाचक अटी रद्द करून मागील वर्षीच्या मूळ नियमावलीप्रमाणेच लाभ देण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
युपीएससी मुख्य परीक्षेस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत एकरकमी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. यासाठी बार्टी मार्फत अर्ज मागविण्यात आले होते, परंतु अर्ज करताना बार्टी मार्फत त्यांचे स्तरावर विविध नियमावली तयार करून ती जाहिराती मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.
यातील इतर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेता येणार नसल्याच्या अटीसह अन्य चार ते पाच अटी जाचक असल्याच्या अनेक विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या होत्या.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या अटी तातडीने रद्द करून मागील वर्षी २०१९ मध्ये ज्या नियमावलीनुसार या योजनेचा लाभ दिला होता, त्यानुसारच लाभ देण्यात यावा अशा सूचना बार्टीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याने, पात्र विद्यार्थ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *