शरद पवार यांनी सांगितले, शिवसेनेला कधी मदत करणार ते

मागील दिवसांपासून शिवसेनेच्या फुटीर गटाला भाजपाने ज्या पध्दतीने उघडपणे मदत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा जवळ आलेला असतानाच अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेला मदत कधी आणि कशी करणार याची माहितीच दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, दुर्दैवाने एका पक्षाचे दोन भाग झाले आणि त्यामधून एक स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं. गंमत अशी आहे की या गोष्टी होतात. संघर्ष होतो पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. ही मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते काही राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. राज्याचे जे जबाबदार (मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस) लोक आहेत, त्या लोकांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकली पाहिजे आणि मग ती पावलं टाकण्याची जबाबदारी ही आम्हा लोकांसारखे वरिष्ठ लोकांवर असेल. त्याहीपेक्षा राज्याचे जे प्रमुख आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत. ते पक्षाचे प्रमुख असतील पण महाराष्ट्राच्या १४ कोटी लोकांचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे. अपेक्षा अशी करूयात की यामधून शेवटी जी काही उद्या ते मांडणी मांडतील, त्यात कटूता नसेल अशाप्रकारची मांडणी दोन्ही बाजूंनी केली तर राज्यातील वातावरण सुधारायला मदत होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात आणि शिंदे सेनेच्या मेळाव्यात तिसऱ्या पक्षाने पडू नये. दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे. तो वेगळा पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यात काही करणार नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केले.

त्याचबरोबर जाहिर झालेल्या अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *