शिवसेनेसह १६ राजकिय पक्षांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लागलेल्या हिंसक वळणास भाजपा जबाबदार असल्याची माहिती पुढे आली. त्यापार्श्वभूमीवर अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला होणाऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तसेच देशभरातील विविध राज्यातही शेतकऱ्यांची आंदोलने सुरु आहेत. मात्र केंद्र सरकार मंजूर केलेले कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाही. त्यातच शेतकऱ्यांचे आंदोलन उधळून लावण्यासाठी भाजपाच्याच नेत्यांनी आंदोलनकर्त्यांनी काढलेल्या टॅक्टर रॅलीला हिंसक वळण लावले. तसेच दिल्लीतील लाल किल्यावर धार्मिक झेंडा फडकवित शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे भाजपेतर पक्षांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

About Editor

Check Also

एलॉन मस्क यांचा सवाल, भारताचे खरे मालक मुकेश अंबानी आहेत का? स्टारलिंक इंटरनेट कंपनीला भारतात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत

भारतात ‘स्टारलिंक’ (Starlink) इंटरनेट सेवा सुरू करण्यातील नियामक अडथळ्यांवरून एलॉन मस्क यांनी आपली टीका अधिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *