महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत आज सकाळी एक शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती पुढे आली असून स्फोटानंतर लगेचच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घटनास्थळाची पाहणी करत या दुर्घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाल्याची माहिती दिली.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात सकाळी १० वाजता आर्डिनन्स फॅक्टरीत हा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारखान्याच्या एलटीपी विभागात हा स्फोट झाला.
यास्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्फोटानंतर एका युनिटचे छप्पर कोसळले तेव्हा किमान १४ कामगार उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दावा केला आहे की आतापर्यंत किमान दोन जणांना वाचवण्यात आले आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरीच्या जवाहर नगर भंडारा येथे झालेल्या अपघाती स्फोटानंतर, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत आणि सध्या बचाव कार्य सुरू आहे. एक छप्पर कोसळले आहे जे जेसीबीच्या मदतीने काढण्यात आल्याची माहिती असे एका जिल्हाधिकाऱ्यांने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
स्फोटाची दुर्घटना घडल्यानंतर अनेक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन विभागाचे कर्मचारी, पोलिस अधिकारी, जमीन महसूल अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. राज्याचे एसडीआरएफ देखील बचाव कार्यासाठी दाखल झाले.
ऑर्डनन्स फॅक्टरीच्या स्फोटावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले म्हणाले, “हे मोदी सरकारचे अपयश आहे.भंडाऱ्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट होऊन ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. मोदी सरकारच्या काळात संरक्षण क्षेत्रातील कंपन्याही सुरक्षित नाहीत, या कंपनीतील स्फोट हे मोदी सरकारचे अपयश आहे. आरडीएक्स बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल या कंपनीत बनवला जातो. ही घटना गंभीर असून सर्वपक्षिय खासदारांच्या समिती मार्फत या स्फोटाची चौकशी करावी अशी मागणीही केली.
स्फोटाचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र या स्फोटाची चौकशी सुरु आहे.
Marathi e-Batmya