मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. या कालावधीत राज्यातील जनतेपर्यंत सरकारतर्फे अन्न धान्य पोहोचविण्यासाठी खाजगी मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची गरज होती. त्यावेळी एस.टी. महामंडळाकडे असलेल्या गाड्यांच्या माध्यमातून अन्न धान्य पोहोचविता आले असते तसेच त्याचे भाडेही मिळाले दिले असते. मात्र त्या परिस्थितीत एस.टी महामंडळ झोपली होती …
Read More »पवार कुटुंबिय पहिल्यादांच एकत्रित न येता दिवाळी साजरी करणार कुटुंबियांचा निर्णय...
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व पवार कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला. त्यामुळे दरवर्षी …
Read More »भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला लागले म्हाडाचे वेध, जोडीला राष्ट्रवादीची शिफारस झोपडपट्टी सुधार मंडळाच्या मुख्याधिकारी पदी नियुक्तीसाठी लॉबींग
मुंबई : विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन वर्षापूर्वी महसूल विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आणि सहकार विभागातील समकक्ष अधिकाऱ्यांना आयएएस पदावर प्रमोशन मिळवून देण्याप्रकरणी मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अधिकाऱ्याला म्हाडात येण्याचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे त्या पदावर सदर अधिकाऱ्याला नियुक्ती मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिफारस पत्र …
Read More »नुकसान सहन करत बिल्डरांच्या सोयीसाठी सरकार आणखी एक निर्णय घेण्याच्या पावित्र्यात मंत्र्याच्या उपस्थितीत बिल्डरांची झाली बैठक
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना भराव्या लागणाऱ्या प्रिमियम शुल्कात नगर विकास विभागाने आधीच घट केलेली असताना त्या शुल्कात आणखी घट करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत असून यासंदर्भात बिल्डरांच्या आणि संबधित “बॉस” च्या उपस्थित आज मंगळवारी एक बैठक झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. लॉकडाऊन काळात …
Read More »मनसे कार्यकर्त्याच्या आत्महत्येमुळे राज ठाकरे जेव्हा व्यथित होतात, तेव्हा… पुन्हा अशी श्रध्दांजली वाहण्याची वेळ येवू देवू नका असे भावनिक आवाहन
मुंबई: प्रतिनिधी नांदेडमधील मनसैनिकाने जात आणि पैशामुळे राजकारण करू शकत नसल्याचे कारण देत आपण सोडून जात असल्याचे सांगत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे व्यथीत झालेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर सगळ्यात मलाच जास्त त्रास होईल असे सांगत जात आणि पैशाच्या …
Read More »नागपूर मॅट कोर्टाच्या आदेशामुळे “गुच्छ” दिलेले अधिकारी झाले हवालदिल दिलेला परत मिळणार का? बदली रद्द झालेल्या अधिकाऱ्यांची विचारणा
मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमध्ये वित्त विभागाने बदल्या करण्यास मनाई करणारा आदेश काढूनही महसूल विभागाने तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणावर केल्या. या बदल्या करताना सदर अधिकाऱ्याचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला की नाही हे पाहताच केल्याने नागपूरच्या मॅटने महसूल विभागाने केलेल्या सर्व बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र या …
Read More »इंडियन ऑईलचा इंडेन गॅस बुक करायचाय? मग हा नवा नंबर डायल करा ग्राहकांसाठी देशभरात आता एकच बुकिंग नंबर
मुंबई : प्रतिनिधी सणासुदीच्या दिवसात देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इंडियन ऑइल तर्फे आणखी एक पुढाकार घेत इंडेन घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग साठी एक कॉमन नंबर जारी केला आहे. आता ग्राहक ७७१८९५५५५५ या नंबर वर गॅस सिलिंडर बूक करू शकतील. ग्राहकांसाठी ही सुविधा 24×7 उपलब्ध असेल. या क्रमांकावर SMS किंवा IVRS च्या माध्यमाने LPG सिलिंडर बूक करता येऊ …
Read More »“जनराज्यपाल” या पुस्तकावरून शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींना टोला राज्यघटनेत जनराज्यपाल पदच नसल्याचे खोचक पत्र
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी पद स्विकारल्यापासून केलेल्या कामाचा आढावा पुस्तक स्वरूपात “जनराज्यपाल ” नावाने प्रकाशित केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना खोचक पत्र लिहिले. त्यामुळे राज्यात ठाकरे विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष महाराष्ट्राने अनुभवत असतानाच भविष्यात पवार विरुद्ध …
Read More »सर्वोच्च असो किंवा कोणतेही न्यायालय ६ महिन्यानंतर स्थगिती आदेश संपुष्टात येणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील एखाद्या क्रिमिनल किंवा दिवाणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयासह देशातील कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिली असेल मात्र त्यास ६ महिन्याचा कालावधी उलटून गेला असेल तर त्या स्थगितीचा आदेश आपोआप रद्दबातल होणार असल्याचा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हे आदेश जारी करण्यात आल्याचे …
Read More »महसूल मंत्री थोरातांच्या आदेशाने झालेल्या उपजिल्हाधिकारी- तहसीलदारांच्या बदल्याच बेकायदा नागपूर मॅट कोर्टाने ४० जणांच्या बदल्या बेकायदेशीर ठरविल्या
मुंबई : विशेष प्रतिनिधी लॉकडाऊन काळात वित्त विभागाने बदल्या करण्यावर निर्बंध घातलेले असतानाही महसूल विभागाने राज्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या. तसेच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर “गुच्छ”चे आदान प्रदान झाल्याची चर्चा त्यावेळी महसूल विभागात रंगली होती. विशेष म्हणजे यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतल्याने नागपूरच्या मॅट …
Read More »
Marathi e-Batmya