पंतप्रधान मोदी म्हणाले, “जो बसत आणि ऐकत नाही त्याला काय उत्तर देणार” खाजगी वृत्तसंस्थेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा

मराठी ई-बातम्या टीम

देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासह अनेक मुद्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशानाच्या सुरवातीलाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न मांडत मोदी सरकारला निशाला साधला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवस काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवित टीकास्त्र सोडले. तरीही काल राहुल गांधी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी अद्याप माझ्या प्रश्नांना उत्तर दिली नाहीत. परंतु मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

यापार्श्वभूमीवर एका खाजगी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जो व्यक्ती सभागृहात बसत नाही, ऐकत नाही त्या व्यक्तीला काय उत्तर देणार असा प्रतिप्रश्न करत राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर देणार नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.

परंतु ज्यांनी ज्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना कधी परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री आणि जिथे मी उत्तर देणे आवश्यक आहे, तिथे मी उत्तर दिल्याचे ते म्हणाले.

त्यावर त्या वृत्त संस्थेच्या प्रतिनिधीने राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर दिलेले नसल्याबाबत विचारले असता पंतप्रधान म्हणाले की, मला शाब्दीक हल्ला करण्याची भाषा माहित नाही. मी माझ्या तर्काच्या आणि वस्तुस्थितीच्या आधारे भाषण करतो. कदाचीत माझ्या भाषणातून प्रसारमाध्यमांना हवे असलेले खाद्य किंवा हेडलाईन त्यातून मिळत असावीत. पण आम्ही सौम्य भाषेत बोलतो. टोका टोकीही होते, वाद विवाद ही होतात. पण मी अनेकवेळा हसतखेळत विषय मांडतो. काही विषयांवर परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री यांनी सविस्तर उत्तर दिली. ज्या विषयांवर मला बोलणे आवश्यक वाटले त्यावर मी ही बोललो. पण जे व्यक्ती सभागृहात ऐकत नाहीत, बसत नाहीत त्यांच्या वक्तव्यावर मी काय उत्तर देणार ?

त्यावर पुन्हा वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने प्रश्न केला की तुम्ही १०० वर्षे सत्तेत न येण्याचे ठरवले आहे तर आम्ही ही १०० वर्षाचा निर्धार केलाय या वक्तव्याबाबत विचारले असता पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही चुकीच्या वाईट गोष्टींकडे बघु देणार नाही. तसेच जनतेच्या हितासाठी संस्थांची निर्मिती करू, त्याच संस्था चालवू आणि जनतेच्या हितासाठीच झिजत राहु आणि त्यादृष्टीनेच काम करू. देशाला विध्वंस करणारे रस्ते आम्ही कधीच येवू देणार नसल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

कॉकरोच जनता पार्टीत टीएमसीच्या दोन खासदारांनी केला प्रवेश, दोन दिवसात ४० हजार सदस्य सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी केलेल्या वक्तव्याच्या नावावरून राजकिय पक्षाचे नाव

“धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी.” हे झुरळ जनता पक्षाचे (CJP) ब्रीदवाक्य आहे. हा भारतातील एक नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *