शिवसेना उबाठा गटाचे कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे यांच्यासह उबाठा सेनेच्या ७ जणांवर ठाण्यातील कोपरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे आणि दारू वाटप करताना पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात काल रात्री २ वाजता …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा मविआचे चांदिवलीचे उमेदवार नसीन खान यांच्या मुख्य पोलींग एजंटची निवडणूक आयोगाकडे तक्रार
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा …
Read More »विधानसभा निवडणूकसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात ५८.२२ टक्के मतदान सर्वाधिक मतदान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणूकीसाठी विदर्भात प्रामुख्याने लढत होती ती काँग्रेस आणि भाजपामध्ये होती. तसेच भाजपाच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या सर्वाधिक सभा या विदर्भातच झाल्या. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, …
Read More »मतदानाच्या दिवशीच महायुती आणि महाविकास आघाडीत आघाडी धर्माची ऐशीतैशी राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी काँग्रेसचा उबाठाला, तर मनसेला भाजपाचा पाठिंबा
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी आज मतदानाला सकाळी सुरूवात झाली. मात्र मतदानाला नुकतीच सुरुवात झाल्यानंतर ज्या विधानसभा जागेवर ज्या पक्षाने दावा केला. मात्र महायुती किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षाने त्याच जागेसाठी प्रबळ दावेदार असलेल्या पक्षाच्या उमेदवारालाच अपक्ष किंवा तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय त्याच उमेदवाराच्या पारड्यात मतदान टाकल्याची माहिती पुढे आली …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मतदारसंघात वसतिगृहातील विद्यार्थ्यानाच बनविले मतदार काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्याकडून विद्यार्थी मतदारांची मतदान केंद्रावरच तपासणी
विधानसभा निवडणूकीची घोषणा जाहिर झाल्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीची आणि त्यांच्या रणनीतीची चर्चा अहमदनगरसह संपूर्ण राज्यात सुरु झाली. त्यातच काँग्रेसकडून प्रभावती घोगरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रभावती घोगरे विरूद्ध राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात सामना सुरुवातीला एककल्ली वाटत होता. मात्र आज …
Read More »नांदगांवात समीर भुजबळ यांना सुहास कांदे यांची धमकी… महायुतीतच बेबनाव मतदाराची टक्केवारी वाढविण्यासाठी एकमेकांना आव्हान
साधारणतः ११ वाजल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नांदगांव मधील उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीस उभे टाकलेले समीर भुजबळ यांच्यात आज चांगलीच वादावादी झाली. मतदारांच्या एका गटाला आणण्यावरून दोघांत वादावादीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांना तुझा मर्डर फिक्स असल्याची धमकी दिली. झाले असे की, छगन …
Read More »नाना पटोले यांचा विश्वास, विधानसभेत काँग्रेसच एक नंबरचा पक्ष… बिटकॅाईन प्रकरणातील व्हायरल क्लिपमधील आवाज माझा नाही
विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे, असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा …
Read More »विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान अनेक जिल्ह्यात वाद, भांडणे आणि बोगस मतदानाच्या तक्रारी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. मात्र यंदाची विधानसभा मतदानाचा दिवस हा राज्याच्या विविध जिल्ह्यात दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांची भांडणे, समर्थक आणि बोगस मतदानाच्या तक्रारीमुळे आज मतदानाचा दिवस थंडीच्या पाऱ्यातही चांगलाच गरम राहिला. तर …
Read More »मतदानासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी तैनात आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात ५३२ एफ. आय. आर.
‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४’ अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावी, यासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र …
Read More »राहुल गांधी यांचा खोचक सवाल, मोदीजी ५ कोटी कुणाच्या सेफमधून निघाले? भाजपाचे विनोद तावडे यांच्या पैसे वाटपाच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांचा सवाल
विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महामंत्री अर्थात महासचिव विनोद तावडे यांच्याकडून नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपयांचे वाटप करण्यात येत असल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यातच पाच कोटी वाटपाचे प्रकरणाची कुणकुण लागताच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख …
Read More »
Marathi e-Batmya