Tag Archives: विधानसभा निवडणूक

भाजपाकडून विनोद तावडे यांचे निवेदन, सीसीटीव्ही तपासा… निवडणूक आयोगाकडून चौकशी होऊन जाऊ द्या

वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल,…निवडणूक आयोग काय झोपला आहे का? भाजपा युतीकडून साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर, प्रचार संपल्यानंतरही भाजपा नेते विरारमध्ये काय करत होते

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत. सर्वात आश्चर्याची व गंभीर बाब म्हणजे हे सर्व घडत असताना पोलीस दल व निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का? असा सवाल करून भाजपा नेते विनोद …

Read More »

विनोद तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल? पोलिस यंत्रणा काय म्हणते नेमकं पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले म्हणतात दोन गुन्हे दाखल केले

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी ४८ तासापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे विनोद तावडे यांना विवांता हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्ये आणि हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांनी केला. त्यानंतर तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे आणि भाजपाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्यामुळे तणावग्रस्त घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, मग आता काय हा भाजपाचा “नोट जिहाद” विनोद तावडे यांच्याकडून पैशाच्या वाटप प्रकरणावरून भाजपावर साधला निशाणा

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी काही तास शिल्लक असताना भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना विवांता हॉटेल्समध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी रेड हॅण्डेड पकडले. त्यानंतर ठाकूर पिता पुत्र आणि विनोद तावडे यांच्यात शाब्दीक बाचाबाचीही झाली. यावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटण्यासाठी पाच …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, महायुती जनमत विकत घेतेय, विनोद तावडेंना तात्काळ अट करा पराभवाच्या भितीने भाजपाकडून राज्यभरात पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न

भारतीय जनता पक्ष आणि महायुती पराभवाच्या भितीने मोठ्‌या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत असून भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार मध्ये मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचे आरोप केले जात आहेत त्यामुळे तावडे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी …

Read More »

आधी हिंतेंद्र ठाकूरांचे विनोद तावडेंवर आरोप नंतर ठाकूरांनीच तावडेना बाहेर काढले विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांची पत्रकार परिषद रद्द

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपये वाटत असल्याचे प्रकरण बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनीच उघडकीस आणले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर विनोद तावडे भाजपामधील एका बड्या नेत्याच्या …

Read More »

बविआने पैशासोबत पकडल्यानंतर विनोद तावडे यांचा खुलासा, मी कार्यकर्त्यांना…. विवांता हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी आलो होतो

बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना पैशाच्या बॅगेसह आणि पाकिटासह विवांता हॉटेलमध्ये पकडल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पुढील कारवाई होण्याआधीच विनोद तावडे यांनी एका प्रसारमाध्यमाला खुलासा केला. विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो असे स्पष्टीकरण …

Read More »

बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांना ५ कोटी आणि नावाच्या डायरीसह पकडले विवांता हॉटेलमध्ये झाला राडा

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार थंडावल्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील ४८ तास सर्वच राजकिय पक्षांना मतदारांना प्रलोभने दाखविण्यापासून ते छुपा प्रचार करण्यापासून रोखणारा आदेश जारी केला. आम्ही कायद्याने चालणारी आणि मतदारांना कोणतेही प्रलोभने दाखवत नसल्याचा कांगावा करणाऱ्या भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितीज ठाकूर आणि …

Read More »

राजकिय पक्षांच्या प्रचार तोफा थंडावल्या, निवडणूक आयोगाने जारी केला महत्वाचा आदेश राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई

राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने सुरु असलेल्या सर्वपक्षिय प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मागील २० ते २५ दिवसापासून राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून सातत्याने आपपाल्या प्रतिस्पर्धी पक्षावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या वतीने भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी पुन्हा एकदा धार्मिक आधारावर मते मागण्याचा अजेंडा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाचा …

Read More »

मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता मोफत वाहन व्यवस्था • समन्वय अधिकारी व रूट प्लानची माहिती मिळण्यासाठी क्युआर कोडची निर्मिती

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत मतदान होणार आहे. ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ (No voters to be left behind) या निवडणूक आयोगाच्या घोषणेप्रमाणे मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी …

Read More »