Tag Archives: bjp

लव्ह जिहाद प्रकरणी अबु आझमी यांनी दाखल केला मंत्री लोंढांच्या विरोधात हक्कभंग चार महिन्यांत एकही प्रकरण नाही खोटारड्या लोढांना मंत्रिपदावरून हटवा!

राज्यात लव्ह जिहादच्या एक लाख प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. मात्र त्यांच्याच विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या डिसेंबरपासून लव्ह जिहादचे एकही प्रकरण घडलेले नाही. त्यामुळे लोढा हे खोटे बोलत असल्याचे सिध्द झाले असून त्यांना तातडीने मंत्रिपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी समाजवादी पार्टीचे …

Read More »

राहुल गांधीच्या माफीप्रकरणी संजय राऊत म्हणाले, माफी मागायची असेल तर आधी… गांधींच्या विधानावर संसदेत सध्या सुरु भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आक्रमक भूमिकेवर राऊत यांचे वक्तव्य

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे लंडनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी तेथील भारतीय पत्रकारांच्या संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान आणि तेथील थिंक टँक या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशातील एकूण राजकिय घडामोडींवर भाष्य केले. त्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली असून, संसदेतही भाजपाकडून राहुल …

Read More »

आता चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही बावनकुळेंच्या वक्तव्याची री…आमची तयारी विधानसभेसाठी २८८ तर लोकसभेच्या ४८ जागांची भाजपाकडून तयारी

राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवरील अंतिम सुनावणी कधी लागेल याबाबतचा कोणताही अंदाज स्पष्टपणे दिसून येत नाही. तसेच राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांही अद्याप लांब असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त ४७ जागा विधानसभेच्या निवडणूकीत देणार असल्याचे सांगत २४० जागांवर भाजपाची तयारी असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. त्यावरून …

Read More »

पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्या आक्रमतेपणावर सध्या झाकण, पण…. कोणापुढे झुकणार नाही वक्तव्य करत इशारा

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज१८ मार्च रोजी पार पडले. या कार्यक्रमाला राज्यातल्या तसेच केंद्रातल्या अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या …

Read More »

छगन भुजबळ भावनिक होत म्हणाले, माझा धाकटा भाऊ स्व.गोपीनाथराव मुंडे असते तर मी… लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीसह समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेलं काम शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू ठेवणार

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या …

Read More »

छत्रपतींच्या नावानेच शाळा आणि क्रिकेटची सुरुवात जाणता राजा महानाट्याला हजेरी लावल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण

शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्याने आणि माझ्या क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली, अशा शब्दांत भारतरत्न सचिन तेंडुलकर याने आज भावना व्यक्त केल्या. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी “जाणता राजा” या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले असून पहिल्या प्रयोगा पासूनच …

Read More »

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला फडणवीसांची पाठ मात्र गडकरी, मुख्यमंत्री हजर नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न

भाजपाचे नेते तथा केंद्रीय कृषीमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण नाशिक येथील नांदूर शिंगोटे येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे या उपस्थितीत करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

नाना पटोलेंचा टोला, एकनाथ शिंदेंचे चांगले व्हावं हिच आमची सदिच्छा, पण आता कुठे सुरुवात… चंद्रशेखर बानवकुळे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून शिंदेना काढला चिमटा

भाजपा कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढेल, अशा आशयाचं विधान केले. तसेच फक्त ४८ जागा शिंदे गटाला देण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी या विधानवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

काँग्रेसची टीका, बागेश्वर धामच्या भोंदू बाबाला पाठिंबा देणारा भाजपा मनुवादी धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान

जगतगुरु संत तुकाराम महाराज व वारकरी चळवळ ही महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. थोर साधु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आज संतांचा अपमान करणाऱ्यांच्या कार्यक्रमाला खुलेआम परवानगी दिली जाते. बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

जयंत पाटील यांचे भाकीत,…तर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून केली टीका

भाजपा शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय. परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजपा चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जयंत पाटील आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी …

Read More »