विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निधी वाटपाला आणि सुरु झालेल्या कामांना स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही आमच्यापेक्षा जास्तवेळा निवडूण आलात. आम्ही तुमच्यापेक्षा कमी वेळा …
Read More »नाना पटोलेंचा सवाल, मंत्री चंद्रकांत पाटलांवर गुन्हे का दाखल करत नाही? मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले आहेत का ?
भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहतील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते व मंत्री …
Read More »आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता भाजपाचे लक्ष्य ५१ टक्के मते राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
लोकसभेच्या २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या महासंग्रामासाठी ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने कामाला लागावे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्यासाठी संघटना बळकट करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले. भाजपाचे …
Read More »अंबादास दानवेंच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार खंबीरपणे उभे मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार
सीमावर्ती भागातील गावे आणि मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभे आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच सर्वं सीमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी एक विशेष कार्यक्रम राज्य शासन हाती घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सीमावर्ती भागातील घडामोडींच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित …
Read More »लोकायुक्त कायद्याच्या कक्षेवरून देवेंद्र फडणवीसांची झाली चलबिचल, मुख्यमंत्री तर गप्पच मुख्यमंत्री व मंत्रिमंडळावरही भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये दाखल होणार गुन्हे
अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारसी स्वीकृत करत त्यानुसार राज्यात नवा लोकायुक्त कायदा राज्यात आणण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत या कायद्यानुसार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पूर्णपणे या कायद्याच्या कक्षेखाली येणार असल्याचे जाहिर केले. मात्र त्यांच्या या घोषणेनंतर एका प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू …
Read More »अजित पवारांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचे प्रतिउत्तर, महापुरूषांचे पुरावे मागतात आणि… विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून उपराजधानी नागपुरात सुरू होत आहे. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका, टिप्पणीला सुरूवात झाल्याचे आज दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी आज पत्रकार परिषदेतून विविध मुद्य्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार …
Read More »अजित पवार म्हणाले, नाकाखालून नेलं, मग ते वेशभूषा बदलून जायचे ते काय होते? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून अजित पवारांची टोलेबाजी
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषदही झाली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. अजित पवारांनी यावेळी सीमाप्रश्न, महापुरुषांचा होणारा अपमान, महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योगधंदे आदी मुद्यांवरून …
Read More »नाना पटोले यांचा आरोप,…भाजपाचा तो डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत अतिप्रचंड महामोर्चा
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाच्या प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले पण ईडी सरकार …
Read More »शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात दिला मोदी सरकारला इशारा तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा व शिंदे गटाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केले. या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेला संबोधित करताना केंद्र …
Read More »महामोर्चात उध्दव ठाकरेंचा इशारा, ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर… बाळासाहेबांची शिकवण घेऊन जाऊ म्हणणारे तोतया
महाविकास आघाडीचा महामोर्चा सीएसटी येथे पोहोचल्यानंतर झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल, भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा ह्या मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही जणांनी विचारलं तुम्ही चालणार का? मी एकटा नाही, …
Read More »
Marathi e-Batmya