राज्यात महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आता महाराष्ट्र बदलणार, विकासाच्या वाटेवर चालणार म्हणून भला मोठा बँनर शपथविधीच्या ठिकाणी लावला. त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्र आता बदल्याशिवाय राहणार नाही, विकासाच्या वाटेवर चालल्याशिवाय राहणार नाही …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्य सरकार तात्काळ बरखास्त करा भाजपा परिवारातील संस्थांकडून औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन
राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता स्थापित करणे, त्याचबरोबर जनतेमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील हे पाहण्याची संविधानिक जबाबदारी राज्य सरकारवर असते परंतु दुर्देवाने महायुती सरकार जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता धर्मांधतेचे विष पसरवत आहे. भाजपाच्या परिवारातील संस्था औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन करतात आणि मंत्री व मुख्यमंत्री वक्तव्ये करतात. राज्यातील आजची परिस्थिती पाहता राज्य सरकार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? केस गळतीवरील पद्मश्री हिम्मतराव बावस्करांच्या संशोधन अहवालाला सरकारने केराची टोपली दाखवली का?
बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामारे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे पण तीन महिने झाले सरकारने केस गळती व टक्कल पडण्याच्या कारणाचा अहवाल जाहीर केलेला नाही. सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा …
Read More »विधानसभेत भास्कर जाधव यांचा हल्ला बोल, तर पत्र मागे घेतो… विरोधी पक्षनेता पदी निवड का नाही ?
विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अण्णा बनसोडे यांची निवड झाली. यावेळी अभिनंदनचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आल्यानंतर विरोधकांकडून भास्कर जाधव बोलताना म्हणाले की, अधिवेशन संपत आले. आज शेवटचा दिवस आहे. उपाध्यक्ष पदाची निवड झाली, मात्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड का नाही झाली? असा सवाल उपस्थित केला. विधानसभेच्या विरोधी …
Read More »लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्याची परवानगी नाकारली ७० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतली भेट
लोकसभेचे उपनेते गौरव गोगोई, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि काँग्रेसचे व्हीप माणिकम टागोर आणि इतर ७० जणांसह काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांनी बुधवारी (२६ मार्च २०२५) लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात संधी नाकारल्याचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी राहुल गांधी यांना …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा इशारा, संविधान बदलण्याचा प्रयत्न कराल तर सत्ता बदलली जाईल संविधानाची पायमल्ली केली जात आहे, सत्ताधाऱ्यांनी अंतर्मुख व्हावे
भारत या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला काय अधिकार आहेत, आपली कर्तव्य काय आहे हे आपल्याला संविधानाने शिकवले. कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा म्हणून सर्वश्रेष्ठ असलेला ग्रंथ संविधान आहे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित संविधानाची गौरवशाली वाटचाल या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, कोळीवाडे व गावठाणांना झोपडपट्टी घोषीत करून मुंबईच्या भूमिपुत्रांवर अन्याय मुंबईतील सर्व गावठाणे आणि कोळीवाड्यांचे तातडीने मॅपिंग करा !
मुंबईतील गावठाणे आणि कोळीवाडे हे मुंबईच्या अस्तित्वाचे आणि सांस्कृतिक वारशाचे अविभाज्य भाग आहेत.मात्र, मुंबईचा तुकड्या-तुकड्याने लिलाव करण्याच्या कटात गुंतलेल्या या सरकारने भूमिपुत्रांवर घाला घातला आहे. गावठाणे आणि कोळीवाडे हे स्लम नाहीत असा स्पष्ट शासन निर्णय (GR) असूनही, त्यांना स्लम घोषित करून भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणण्याचे आणि या भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करण्याचे …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कोरटकर व सोलापुरकरांवर काय कारवाई केली? हे कोणाचे हस्तक आहेत ?
नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण …
Read More »महात्मा जोतीबा फुले व सावित्रीमाई फुलेंना ‘भारत रत्न’ द्या खासदार वर्षा गायकवाड यांची संसदेत मागणी
क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले या महान विभूतींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्नने गौरवण्यात यावे, अशी शिफारस करणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने पारित केला, त्याचा आनंद आहे. काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी २०१५ साली फुले दांपत्याला भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी लोकसभेत केली होती. आता केंद्र सरकारने सर्व …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शिंदेंचा सरकार, गृहविभागावर विश्वास नाही का? कुणाल कामराने कोणाचेही नाव घेतले नसताना एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी चिडून हल्ला करण्याचे कारण काय?
हास्यकलाकार कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेऊन तोडफोड केली. हल्ला करणारे सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का, त्यांना कायदा हातात का घेतला. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडलेला हा उच्छाद पाहून …
Read More »
Marathi e-Batmya