Tag Archives: devendra fadnavis

राज्यातील कर्करोग उपचारासाठीच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरीः महाकेअरची स्थापना महाकेअर फाऊंडेशनची स्थापना, त्रिस्तरीय रचनेतून राज्यभरातील १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) कंपनी स्थापन करण्यास तसेच या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ओला दुष्काळाची मागणी, पण तशी तरतूदच नाही गेल्या महिन्यात ६० लाख हेक्टरचे नुकसान, शेतकऱ्यांना केवायसीची अट शिथिल

गेल्या महिन्यात सातत्याने अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचा आढावा घेतला. सुमारे ६० लाख हेक्टर नुकसान झाल्याचा अंदाज असून पहिल्या टप्प्यात ऑगस्ट पर्यंत २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे. पण सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मराठवाडा आणि सोलापूरातील धरणातून पाण्याचा विसर्ग पूरपरिस्थितीचा आणि धरणातील विसर्गाची घेतली माहिती

मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. काल रात्री सुद्धा ते स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी जलसंपदा विभागाकडून एकूणच राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यातील नैसर्गिक …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त टोलमाफ करा टोलमाफीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी देशभरातून नागपूरच्या दीक्षाभूमी येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान बौद्ध अनुयायांना टोलमाफी देण्याची मागणी केली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार उत्तर महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘४जी’ सेवेचे लोकार्पण बीएसएनएलच्या स्वदेशी '४जी' सेवेमुळे महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळण्यात मदत होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘४जी’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी ९ हजार ३० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत ‘४जी’ तंत्रज्ञान पोहोचणार असून …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, भाजपाला सरकार चालवता येत नाही हा डोळस विश्वास पूरग्रस्तांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे, पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रूपये द्यावेत

राज्यातील भाजपाला प्रशासन कळत नाही, त्यांना सरकार चालविता येत नाही. जे काही राज्यात सुरु आहे ते दिल्लीच्या बळावर सुरु आहे. त्यामुळे माझा अंध नव्ह तर डोळस विश्वास असल्याची टीका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस गेले पूरग्रस्तांसाठी मदत मागायला, येताना मात्र मेट्रो, पोलाद सिटी, जमीनीवर चर्चा पंतप्रधान मोदींची घेतली भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत, निवेदन सादर

मराठवाडा प्रांतातील जवळपास सर्व जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. तसेच त्यांची जनावरंही बुडून मरण पावली तर काही वाहुन गेली.तसेच अनेक गावं आणि वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचे संसार उघड्यावर पडल्याचे चित्र पूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यातच राज्याच्या तिजोरीत पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांपेक्षा सुरजागडच्या खाण मालकाची जास्त काळजी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे

महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण …

Read More »