Breaking News

Tag Archives: eknath shinde

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजावाडी हॉस्पिटलची क्षमता वाढवणार

राजावाडी हे रुग्णालय मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहे. या रुग्णालयाची क्षमता १००० बेडपर्यंत वाढविण्याचा मानस असून अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल. हॉस्पिटलमधील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यावर भर देण्यात येत आहे. रुग्णालयात असताना नागरिकांना औषधे बाहेरुन आणावी लागू नयेत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदें कडून स्फोट दुर्घटनेवर शोक: मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला,… मग तुम्ही कशासाठी अदानीचे बुट चाटतय

मध्यंतरी सरकारची एक योजना सुरु झाली. शासन आपल्या दारी खरं तर हे सरकार अदानीच्या दारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ५० खोके एकदम ही ओके अशी घोषणा तुमची आहे. मी काही दिली नाही. त्या बोक्यांना आता खोके कमी पडले की काय धारावी आणि मुंबई गिळायला बसले अशी खोचक टोला राज्यातील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून जुन्या पेन्शनबाबत मोठी घोषणा, अर्थसंकल्पिय….

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात निवेदनाद्वारे माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले …

Read More »

नाना पटोले यांची टीका,…भयावह परिस्थितीत सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर

छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, … ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करणार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जाहीर केला. हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले. यासंदर्भात सदस्या अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देऊन राम भक्तांना केले मार्गस्थ

जय श्रीराम, सियावर राम चंद्र की जय..च्या जयघोषात आज मीरा भाईंदर येथील रामसेना फाउंडेशनचे ३०० राम भक्त कार्यकर्ते हे मीरा भाईंदर ते अयोध्या हा प्रवास पायी करण्यासाठी आयोध्येकडे मार्गस्थ झाले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने हा पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. …

Read More »

नगरविकास खातं आणि मंत्री नेमके कोणाचे? जनतेचे की खाजगी कार्पोरेट कंपन्यांचे

स्वतंत्र भारताची राज्य घटना देशाने स्विकारून जवळपास ७५ वर्षे लोटली. तसेच केंद्रातील भाजपा सरकार आणि महाराष्ट्रातील भाजपा प्रणित शिंदे सरकार स्थानापन्न असून या सरकारांनी मागील दोन वर्षापासून अमृतकाल साजरा करत आहे. परंतु राज्य सरकारच्या विभागांच्या यादीत असलेल्या नगर विकास खातं हे खाजगी कार्पोरट कंपन्याच्या हिताचे संरक्षण करत असल्याचा दावा करत …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा उपरोधिक टोला, ….तो फोटो पाह्यला आणि मला हसूच आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वच्छता मोहिमेतील ट्रॅक्टर चालवतानाच्या फोटोवरून टीका

पाच राज्यातील निवडणूकांमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील तीन राज्ये भाजपाने हिसकावून घेतली आणि काँग्रेसला बऱ्याच वर्षानंतर फक्त दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील सत्ता पुन्हा मिळविता आली. विशेष म्हणजे भाजपाच्या विरोधात निर्माण झालेल्या इंडिया आघाडीच्या बाजूने वातावरण असतानाही भाजपाला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला. त्यातच राज्यात काँग्रेस, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष …

Read More »

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, …शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध

भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात …

Read More »