Tag Archives: farmers

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नाना पटोलेंनी दिला शिंदे-फडणवीस सरकारला हा इशारा शेतकऱ्यांना धीर देण्यात राज्य सरकार अपयशी; ईडी सरकार शेतकरी विरोधी

राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट असून कापूस, धान, तुर, मका, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देण्यात कमी पडले आहे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारला सभागृहात जाब विचारू व शेतकऱ्यांना …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारचे नक्षलवादी, दहशतवादी, आंदोलजीवी संबोधून भाजापाकडून शेतकऱ्यांचा अपमान

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला उद्ध्वस्त केले जात …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, भाजपा सरकारच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ कांद्यावरील निर्यातबंदी उठवा व १५०० रुपये हमी भाव द्या

भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही घसरले आहे. कांदा काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी उठवावी, कांद्याला १५०० रुपये हमी …

Read More »

नाना पटोलेंची मागणी, शेतकरी लाठीचार्जची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करा शेतकऱ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी पोलिस अधिक्षकाला तात्काळ निलंबित करा

शेतमालाला दववाढ मिळावी व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला. आपल्या न्याय व हक्कासाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलिस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णयः अभिमत विद्यापीठांमध्ये स्कॉलरशीप अभिमत विद्यापीठातील मागासवर्गीय विद्यार्थी, शेतकऱ्यांसाठी आणि इतर महत्वाचे निर्णय

मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही. त्यामुळे मागील आठवड्यात प्रलंबित राहिलेल्या प्रस्तावावरील सर्व निर्णय आणि चालू आठवड्यात नव्याने दाखल झालेल्या महत्वाच्या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेत मागासवर्गीय विद्यार्थी, शेतकरी, नवी मुंबई शहर, सोलापूर-सातारा जिल्हा, आणि दुय्यम सेवा मंडळाच्या नोकरीसाठी जाणाऱ्या उमेदवारांना एक हजार रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळत आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळते आहे. या कृषी महोत्सवामुळे पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठे पाठबळ मिळत असून आपले शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

जमिनीच्या तक्रारी सोडविण्यासाठी महसूल विभागाकडून खास अभियान राज्यात उद्यापासून ‘महाराजस्व’ अभियान

सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व अभियान २६ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार असून महसूल व वन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे. एक …

Read More »

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खत पुरवण्याची जबाबदारी आता सहकारी संस्थांवर सहकारमंत्री अतुल सावे यांचे सहकारी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण क्षेत्रात सहकारी संस्थांची महत्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि वेळेत खत पुरवठा व्हावा, यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केले. पणन महासंघ अधिमंडळाची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. त्यावेळी सहकार मंत्री सावे बोलत …

Read More »

शरद पवार म्हणाले, …शुध्द बेण्याचा वापर वाढला पाहिजे हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे

भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. …

Read More »

अजित पवार सरकारला म्हणाले, …मुजोर बँकांना कडक शब्दात समज द्या शासन आदेश धुडकावत पीक कर्जासाठी बँकांकडून ‘सीबील’ची सक्ती

राज्यातील काही व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज देताना ‘सीबील’ अहवाल विचारात घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत मी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज देताना ‘सीबील’ स्कोअर पाहिला जाणार नसल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. त्याबाबत शासनाने आदेश …

Read More »