नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठरावाच्यावेळी काल काहीजणांनी हे चालेची ना ते चालेची ना सारखे काहीतरी म्हणत होते. मात्र आम्ही कमी बोलतो, जास्त काम करतो असे सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाषेत सांगायचे तर संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो अशा पध्दतीचे आमचे राज्य …
Read More »शेतकरी आशेने बघतोय मात्र सरकारकडून फसवणूक सुरूय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
नागपूरः प्रतिनिधी राज्यात तीन पक्षांचे मिळून सरकार सत्तेवर बसलय. सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या सरकारकडून शेतकऱ्यांची अजूनही फसवणूकच करण्यात येत असून कर्जमाफीची घोषणा अद्याप केली नाही. उलट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी केवळ ५ हजार ६०० कोटी रूपयांची तरतूद केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »शेतकर्यांना उभे करण्यासाठी हातभार लावा अन्यथा …. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा इशारा
नाशिक: प्रतिनिधी शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. सरकारने तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही याविरोधात ठोस भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज नाशिकमध्ये शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी केली. शेतकर्यांच्या झालेल्या …
Read More »मुख्यमंत्र्यांनी घेतला अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी होणार बैठक
मुंबई: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्यावतीने करण्यात …
Read More »महाराष्ट्र सुर्य किरणांनी आणखी तापणार वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ …
Read More »सांगोल्यातील शेतकऱ्यांना पवारांचा मदतीचा हात दुष्काळामुळे शिक्षणात अडचणी येत असतील तर मदतीचे शरद पवारांचे आश्वासन
सोलापूर – सांगोला: प्रतिनिधी दुष्काळामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असेल तर मदत करण्याबाबत प्रयत्न करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. आज सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावण्यांची पाहणी …
Read More »मतदारांना भुलविण्यासाठी राज्य सरकारची अशीही चलाखी दुष्काळ, खरीप आणि गृहनिर्माण योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या कामाला गती
मुंबईः प्रतिनिधी निवडणूका आल्या की त्या जिंकण्यासाठी सत्ताधारी, विरोधकांकडून मतदारांना भुलविण्यासाठी कोणती ना कोणती लोकानुनयी घोषणा केली जाते. मात्र निवडणूका जिंकण्यासाठी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारने थेट सरकारी निधीचाच वापर करत मागील दोन वर्षापासून रखडलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाची नुकसान भरपाईचा निधी आणि शहरी भागातील नागरीकांच्या गृहनिर्माण प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणावर वेग …
Read More »शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांना लाभ
तर देशातील १ कोटी १ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून करण्यात आला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील १ कोटी १ लाख ६ हजार ८८० शेतकऱ्यांना यांचा लाभ होणार आहे. यासाठी २ हजार २१ करोड रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात …
Read More »सहा जिल्ह्यांत ७९ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे ठराव
शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमातून मिळतोय एकीचा मंत्र मुंबई : प्रतिनिधी शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्याने एकत्र येण्याची प्रेरणा राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आजवर ७९ …
Read More »पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ
शेतकऱ्यांच्या खात्यात ७२०० कोटी रुपये जमा होणार मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाने जाहिर केलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या ८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ७ हजार २०० कोटी रुपये जमा होणार असून योजनेसाठी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी …
Read More »
Marathi e-Batmya