Breaking News

Tag Archives: government employee

मोठी बातमीः केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी युनिफाईड पेन्शन योजना २३ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभः केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

केंद्राने शनिवारी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) नावाची नवीन पेन्शन योजना जाहीर केली असून या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन, कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि खात्रीशीर किमान पेन्शन मिळणार आहे. ही नवीन पेन्शन योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तात ४ टक्के वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ७ मार्च रोजी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा (DA) अतिरिक्त हप्ता आणि पेन्शनधारकांना ४ टक्के वाढ दर्शविणारे महागाई सवलत (DR) देण्यास मंजुरी दिली. १ जानेवारी २०२४ पासून लागू होणारी ही वाढ DA आणि महागाई रिलीफ (DR) ५० टक्क्यांपर्यंत वाढवेल. या भत्त्याचा ४९.१८ लाख …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना …

Read More »

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ११ कोटी ३४ लाख ६० हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. सध्या मंत्रालयातल्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून जुन्या पेन्शनबाबत मोठी घोषणा, अर्थसंकल्पिय….

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात निवेदनाद्वारे माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले …

Read More »

नाना पटोले यांची टीका,…भयावह परिस्थितीत सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर

छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

गृह विभागाला वाढत्या गुन्हेगारीकडे पाह्यला वेळच नाही, पण सरकारी कर्मचाऱ्यांची भलतीच काळजी

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे सरकार स्थानापन्न होऊन जवळपास १ वर्षे ६ महिने पूर्ण झाले असून २ ऱ्या वर्षपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे. राज्य सरकारचा पंचवार्षिक कालवधीला पूर्ण होण्यास एक वर्ष राहिलेला आहे. परंतु विरोधकांकडून राज्य सरकारकडून राज्यातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्जचा व्यवसाय, वैयक्तिक …

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षपूर्तीचे गिफ्टः वेतनासोबत मिळणार महागाई भत्ता महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ

राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. हा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ होणार आहे. राज्य सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त सरकारी कर्मचा-यांना सरकारने गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांना १ जानेवारी २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार हा महागाईभत्ता …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतला हा निर्णय मृत्यूनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नवीन पेन्शन

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देशातील प्रमुख राज्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्राचही विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत जून्या पेन्शनचा मुद्दा हा कळीचा बनला. त्यानंतर राज्यातील सर्व शासकिय-निमशासकिय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाची घोषणा देत संप सुरु केला. सुरुवातीला या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे संपकऱ्यांना आवाहन करत म्हणाले, समितीचा अहवाल आल्यानंतर पेन्शनचा निर्णय विधानसभेत संध्याकाळी आवाहन केल्यानंतर

राज्यातील १८ लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. यात जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी आहे. संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसरीकडे सरकार आम्ही त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहोत असे सांगत आहे. संपकऱ्यानी आपला संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले …

Read More »