Tag Archives: jayant patil

अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने सरकारकडून लोकशाहीचा खून विरोधकांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत कामकाजाच्यावेळी अनेकदा मंत्री नसतात, प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. उत्तरे प्राप्त होत नाहीत. मंत्री नसल्याने उत्तरे, प्रश्न, लक्षवेधी पुढे ढकलायची पध्दत सर्रास सुरु होती. एककल्लीपणाने सभागृहाचे कामकाज चालविले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी करत केवळ या कारणामुळे …

Read More »

राज्य सरकारने विरोधकांचे तोंड दाबले अध्यक्षांवरील विश्वास दर्शक ठरावावर विरोधकांना बोलण्याची संधी नाकारली

मुंबई: प्रतिनिधी विधानसभेत विरोधकांना गाफील ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास दर्शक ठराव संमत केल्यावरून सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह मंत्र्यांनी विरोधकांना बोलूच न देण्याची भूमिका घेतल्याने सभागृहात सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांचे तोंड दाबल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून अध्यक्षांवरील ठराव मंजूर करण्यात …

Read More »

भाजप सरकारच्या ३० हजार तासात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची सरकारवर टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला सत्तेत येवून ३० हजार तास झाल्याचा उल्लेख केला. आमच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कधीच असे तास, सेंकद, मिनिटे मोजले नाहीत. मात्र अर्थमंत्र्यांनी मोजल्याने त्यांचे काही खरे दिसत नसल्याची उपरोधिक टीका करत तुमचे सरकार आल्यापासून राज्यातील १६ हजार …

Read More »

शाळांचे समायोजन केले, बंद नाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कमी पटसंख्या असेल्या १३०० शाळा बंद नाही तर त्यांचे १ किलोमीटर अंतराच्या परिसरातील इतर शाळांमध्ये समावेश करण्यात आलेले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून त्यांच्या सहली, गँदरींग आदी गोष्टी होत असल्याने त्यांच्या अभ्यासाला गती मिळत असल्याचा दावा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. तसेच या …

Read More »

शिक्षणाला विनोदाच्या तावडीतून सोडवा अजित पवार यांचे शिक्षण विभागावर शरसंधान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे हा विभाग हाताळण्यास अपयशी ठरले आहे. शिक्षणाचा विनोद झाला आहे. या ‘विनोदा’च्या तावडीतून शिक्षण खात्याला सोडवा अशी टीका करत राज्यातील वसतिगृहाची परिस्थिती बिकट आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत, मुलांना शिष्यवृत्त्या मिळाल्या पहिजे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे …

Read More »

एमपीएससी परिक्षेतील रँकेटप्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग सरकार कुणाला पाठीशी घालतेय? विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळावी म्हणून राज्य सरकारकडून एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा घेण्यात येते. मात्र या आयोगाच्या परिक्षेत बोगस परिक्षार्थी बसवून त्या बदल्यात पैसे घेण्याचे प्रमाण उघडकीस आल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी उपस्थित करत असे रँकेट चालविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी आणि …

Read More »

नियम बाह्य पध्दतीने कामकाज होतय? तपासून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांच्या आरोपावर अध्यक्ष बागडे यांचे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी एक मार्च रोजी तारांकित प्रश्न सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली नव्हती. मात्र त्यावेळची प्रश्नोत्तरे आज सभागृहाच्या पटलावर ठेवलीत. मग काल सोमवारी उद्योगमंत्र्यांनी एक मार्च रोजीच्या तारांकित प्रश्नामधील न झालेल्या प्रश्नाबद्दल खुलासा करणे कितपत योग्य असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना करत सभागृहाचे …

Read More »

विधानसभा अध्यक्षांच्या मनमानीच्या विरोधात विरोधकांचा अविश्वासाचा ठराव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होवून एक आठवडा झाला. तरीही विधानसभेत अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडून नियमानुसार कामकाज करण्यात येत नसल्याच्या मुद्यावर विरोधी बाकावरील सदस्यांशी सातत्याने खडाजंगी होत आहे. त्यामुळे अध्यक्ष बागडे यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात विधानसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी …

Read More »