Breaking News

Tag Archives: monsoon session

अजित पवार म्हणाले, मग आम्ही पण शक्तीमान असल्याचे दाखविण्यासाठी तसं… प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीच्या सवालावर अजित पवारांचे उत्तर

शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर राज्याचे पहिलेच विधिमंडळ अधिवेशन होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर बैठकीत चर्चेची माहिती देण्यासाठी विधिमंडळ भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, एक आमदार कोणाचा कोथळा काढा, हात पाय तोडा अशी भाषा करत आहेत. एक बहाद्दर आमदार …

Read More »

अजित पवार यांच्या ‘त्या’ मागणीने प्रशासनाला प्रश्न, उत्तरांना मान्यता कोण देणार? विधिमंडळाकडून उत्तरे पाठविण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून ३९ दिवस झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. आता मंत्रिमंडळ विस्तार होवून तीन दिवस होत आले तरी अद्याप मंत्र्याना खाते वाटप झालेले नाही. त्यातच १७ तारखेपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरे न घेण्याची भूमिका घेणाऱ्या सरकारने आता प्रश्नोत्तरे घेण्याची …

Read More »

नाना पटोले म्हणाले, शिवसेनेने काँग्रेसशी चर्चा करायली हवी होती… शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ साली राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन करण्यात आले होते. आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असली तरी महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल शिवसेनेने काँग्रेस पक्षाशी चर्चा करायला हवी होती. विरोधी पक्षनेते ठरवताना शिवसेनेने काँग्रेसशी …

Read More »

नव्या सरकारचे ९ दिवसांचे पावसाळी अधिवेशन, मात्र ३ दिवस सुट्टीचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

राज्यातील नव्याने स्थानापन्न झालेल्या पण अद्यापही अस्थिरतेच्या भावनेने ग्रासलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथेप्रमाणे नियमित पावसाळी अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यासाठी आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत नव्या सरकारचे नऊ दिवसांचे पावसाळी अधिवेशन बोलाविले असून त्यातील तीन दिवस सुट्टीचे राहणार आहेत. सदरचे सन २०२२ …

Read More »

राज्यपालांच्या आदेशानुसार रखडलेले पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सहा दिवस कामकाज होणार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पाठिंब्यावरील सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जाहिर केलेले नियोजित १७ जुलै रोजी होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. त्यातच शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची एकमेकांच्या विरोधात सुरु असलेली न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुरु आहे. त्यावर अंतिम निकाल …

Read More »

विधिमंडळ अधिवेशन होणारः मंगळवारी उद्याच्या बैठकीत ठरणार तारीख कामकाज सल्लागार समितीची उद्या दुपारी होणार बैठक

राज्यात सत्तांतर होवून जवळपास एक महिना उलटून गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचे नियमित पावसाळी अधिवेशन घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात येणार असून त्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती अर्थात बीएसीची बैठक उद्या बोलाविण्यात …

Read More »

अखेर “या” कारणामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले… राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नसल्याने विधिमंडळाचा निर्णय

राज्यात सत्तांतर होत बंडखोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. मात्र शिंदे-फडणवीसांचा शपथविधी होवून १५ दिवस उलटले तरी या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे उद्या जावून विधिमंडळ अधिवेशन बोलावले तर विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे कोण जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे “ते” वक्तव्य आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पावसाळी अधिवेशनात निलंबित आमदारांबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली

मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन झाल्यानंतर त्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे पुर्नविचारार्थ दाद मागितली का असा सवाल या आमदारांना केला. त्यावर या १२ आमदारांच्यावतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहित दाद मागितली. त्यावेळी सुरु असलेल्या अधिवेशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …

Read More »

तुम्हाला माहिती आहे का? राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या खरीपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण- कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास ७० टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पीकपेरणी व पीकवाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री …

Read More »

रवी राणांना मार्शलकरवी विधानसभा सभागृहाबाहेर काढले चर्चा सोडून मध्येच आंदोलन केल्याने कारवाई

मुंबईः विशेष प्रतिनिधी ओबीसी आरक्षणप्रश्नी मांडलेल्या ठरावावरून सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना चांगलाच रंगला. त्यामुळे विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांकडून देण्यात येत असलेल्या धमक्या, फोन टँपिंग आदींसह विविध विषयावर चर्चा सुरु होती. त्यावेळी नेमके भाजपाचे समर्थक तथा अपक्ष आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरील राजदंड उचलून एकट्यानेच बँनर फडकावून आंदोलन करण्यास सुरुवात केली. …

Read More »