नदीत डुबकी मारल्याने देशातील गरिबी कमी होणार आहे का, गरिबांच्या पोटाला अन्न मिळणार आहे का असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाला यावेळी केला.
मध्य प्रदेशातील महू या गावी जय संविधान-जय बापू-जय भिम या काँग्रेसच्या अभियानात मल्लिकार्जून खर्गे बोलत होते. यावेळी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, इथे बेरोजगारांना रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न करूनही रोजगार मिळत नाही, भूकेलेल्यांना अन्न मिळत नाही हे सर्व काही नदीत आंघोळ केल्याने मिळते का असा उपरोधिक सवाल करत मात्र ते लोक भाजपाचे नाव न घेता नदीत डुबकी घेण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करत आहेत अशी टीकाही यावेळी केली.
मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्याचे औचित्य साधत गंगा नदीत स्नान केले त्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत तर उपासमारीने मरणारी मुले, शिक्षणाचा अभाव आणि व्यापक दारिद्र्य यासारख्या गंभीर मुद्द्यांवर भाजपा नेते या स्थानाच्या विधीला “स्पर्धा” बनवत असल्याचा आरोप केला.
मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, गंगा नदीत स्नान केल्याने गरिबी दूर होते का? त्यामुळे अन्न मिळते का? मला कोणाच्याही श्रद्धेला धक्का पोहोचवायचा नाही आणि माझ्या शब्दांनी कोणाला दुखावले असेल तर मी माफी मागतो. पण मुले उपासमारीने मरत असताना, शाळेत जाऊ शकत नसताना आणि कामगारांना पगार मिळत नसताना, भाजपा नेते गंगा नदीत स्नान करण्याची स्पर्धा करत आहेत. टीव्हीवर चांगले दिसेपर्यंत ते असे करत राहतात. अशा लोकांपासून देशाला काहीही फायदा होणार नाही,” असा हल्लाबोल मध्य प्रदेशातील महू येथे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीला संबोधित करताना टीका केली.
पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, आमचा आक्षेप आहे तो धर्माच्या नावावर गरिबांचे होत असलेल्या शोषणावर आहे. त्यामुळे नदीत डुबकी मारण्यापेक्षा गरिबांची गरिबी दूर करण्याकडे लक्ष द्या असे आवाहनही यावेळी केले.
शेवटी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, नदीत डूबकी मारणाऱ्या अशा लोकांपासून देशाची कोणाचेही भले होणार नाही. आमचा आक्षेप आहे तो धर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाला आहे. त्यामुळे आपणा सर्वांना त्या शोषणाच्या विरोधात लढायचे असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
अरे भाई गंगा में डुबकी लगाने से ग़रीबी दूर होती है क्या, क्या आपको पेट में खाना मिलता है?
मैं किसी की आस्था को कोई ठेस नहीं पहुँचाना चाहता। अगर किसी को दुःख हुआ तो मैं माफ़ी चाहता हूँ।
लेकिन आप बताइए कि जब बच्चा भूखा मर रहा है, बच्चा स्कूल में नहीं जा रहा है, मजदूरों को… pic.twitter.com/tQlf8XqBSI
— Mallikarjun Kharge (@kharge) January 27, 2025
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मल्लिकार्जून खर्गे यांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हणाले की, खर्गे यांचे वक्तव्य म्हणजे सनातन धर्मावर हल्ला आहे. ते इतर कोणत्याही धर्माबद्दल असे बोलू शकतात का? अशी विधाने निंदनीय आहेत आणि काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण द्यावे. हे तेच खर्गे आहेत ज्यांनी म्हटले होते की जर ते सत्तेत आले तर ते सनातन धर्म नष्ट करतील, असेही यावेळी सांगितले.
“मल्लिकार्जून खर्गेजी बोलत आहेत, पण शब्द गांधी कुटुंबाचे आहेत. काँग्रेस हिंदूंचा इतका द्वेष का करते? महाकुंभ १४४ वर्षांनी एकदा येतो, परंतु काँग्रेस नेते इतके संतप्त झाले आहेत की ते हिंदूंना शिव्याशाप देतात. प्रथम, हुसेन दळवी यांनी कुंभमेळ्याची थट्टा केली आणि आता मल्लिकार्जून खर्गे यांनी आघाडी उघडली आहे. काँग्रेस ही नवीन मुस्लिम लीग बनली आहे आणि तिचा नाश राष्ट्रहितात असल्याची टीकाही यावेळी केली.
Marathi e-Batmya