उद्योग प्रकल्पासाठी आलेल्या रामदेव बाबा यांचे वक्तव्य, औरंगजेब आणि त्याचं घराणं लुटारू… नागपूरात पतंजली फूड आणि हार्बल प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी रामदेव बाबा यांचे वक्तव्य

छावा चित्रपट आल्यापासून राज्यात औरंगजेब यांच्यावरील चर्चेला राज्यात जोर आला आहे. त्यातच समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असे सांगितल्याने त्यांच्यावर अर्थसंकल्पिय अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आली. आता त्यात नागपूर येथील मिहान औद्योगिक क्षेत्रात पतंजली फूड आणि हर्बल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या रामदेव बाबा यांनी तर औरंगजेब आणि त्याच घराणं लुटारू होतं असे सांगत ते भारत लुटालयाच आले होते असे वक्तव्य करत त्याचा आदर्श कसा आपल्यासमोर असू शकेल? असे सांगत आपल्यासमोर आदर्श शिवाजी महाराजांच आहे असे सांगितले.

पुढे बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, औरंगजेब हा भारताचा आदर्श असू शकत नाही, औरंगजेब लुटारू होता, त्याचं कुटुंब लुटारू होतं बाबर काही भारतात काही घडवायला आला नव्हता. बाबर, अकबर आणि औरंगजेब त्यांची संगळ मुलं या सगळ्यांनी हरम तयार केले. आपल्या हजारो आया-बहिणींची त्यांनी बेअब्रु केली. आपल्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला, अशी माणसं आपला आदर्श असूच शकत नाहीत. आपला सगळ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आमचा आदर्श औरंगजेब असू शकत नाही असेही यावेळी सांगितले.

रामदेव बाबा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना म्हणाले की, ट्रम्प यांनी टेरिफ टेरडरिझमचा नवा पायंडा पाडला आहे. लोकशाही पायदळी तुडविली आहे, ते वर्ल्ड बँकेचेही ऐकत नाहीत. डॉलरची किंमत वाढवली, गरीब विकसनशील देशांच्या पैशाची किंमत कमी करून एक प्रकारे आर्थिक दहशतवाद डोनाल्ड ट्रम्प चालवित असल्याचा आरोप करत ट्रम्प, पुतीन, शी जिंगपिंग यांचा भरवसा नाही. काही शक्तीशाही देश जगाला विनाशाकडे नेण्याचं काम करत आहेत. त्यासाठी भारतीयांनी एकजुटीने सशक्त राष्ट्र निर्माण करून विध्वसक शक्तींना उत्तर दिले पाहिजे असे आवाहनही यावेळी केले.

पुढे बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, पतंजली फूड पार्कची रोजजी क्षमता ८०० टन आहे. यातून नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार करून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समृद्धी मिळणार आहे. आज संत्र्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी चांगल्या पद्धतीची रोपे तयार करण्यासाठी नर्सरी तयार करू, अन्य ज्या प्रकारची फळे आहेत, त्याचाही नैसर्गिक पद्धतीने ज्युस काढण्याचा प्रयत्न करू, संत्री निर्यात करण्याचा प्रयत्न करू असे सांगत विदर्भाला लागून गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान लगतच्या राज्यातून संत्रा उत्पादन आणण्यासाठी जाऊ असं ससांगतानाच जय जवान, जय किसान, जय मिहान हे महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासनही यावेळी दिले.

 

About Editor

Check Also

सुनेत्रा अजित पवार यांची घोषणा, महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी सवलतीची घोषणा

मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *