उपवर्गीकरणाविरोधातील लाँग मार्च यशस्वी करण्यासाठी मुंबईत बैठक संपन्न बीड ते मुंबई असा लाँग मार्चचे आयोजन

सरकारच्या अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात येत्या १० जूनपासून बीड ते मुंबई असा काढण्यात येणाऱ्या लाँग मार्चचे नियोजन करण्यासाठी मुंबईत विविध पक्ष संघटनांची एकत्रित बैठक मुंबईत संपन्न झाली. यावेळी विविध समित्या स्थापन करून हा मार्च यशस्वी करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.

अनुसूचित जातीमध्ये अ ,ब ,क ,ड असे वर्गीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला यासंदर्भात नियुक्त माजी नाययमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल जाहीर न करता समितीने उपवर्गीकरवर जनतेच्या हरकती व सूचना मागविल्याने राज्यातील ५६  अनुसूचित जातींमधून सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे, राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी येत्या १० जून पासून बीडमधून ,बीड ते मुंबई आजाद मैदान असा लॉन्ग मार्च काढण्याचा निर्णय मागील आठवड्यात  औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या सर्व पक्ष संघटनांच्या वतीने घेण्यात आला . हा लॉन्ग मार्च यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यात बैठक घेण्यात येत असून काल मुंबईच्या घाटकोपर रमाबाई कॉलनी येथील शाहिद स्मारक येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुंबईतील विविध सामाजिक संस्था संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

येत्या १०  जुन पासून  बीडमधून निघणारा लॉन्ग मार्च  मुंबईत २६ जून रोजी येणार आहे. मुंबईत सदर मार्च यशस्वी करण्यासाठी नियोजन समिती, स्वयंसेवक समिती, शासकीय कार्य समिती, सोशल मीडिया समिती, मीडिया समिती, समन्वय समिती ,आदी समित्या स्थापन करण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच मुंबईतील सर्व अनुसूचित जातीच्या संघटना संस्था यांच्याशी चर्चा करून त्यांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्याचे ठरविण्यात आले . मुंबईतील सर्व वस्त्या पिंजून काढून सर्वाना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणी बैठक घेण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले .

अशोक कांबळे, सागर संसारे, विलास रुपवते, कामगार नेते रमेश जाधव, अँड मनाली गवळी, प्रदीप अढांगळे, अविनाश समिंदर, मनोज गायकवाड, आनंद जाधव, ज्येष्ठ कवी बबन सरोदे, दीपक चौगुले, अँड. हर्षवर्धन खांडेकर, मंगेश पगारे, सोना कांबळे, विवेक कांबळे, संदेश कर्डक, मोहम्मद आसीफ मन्सुरी, दादासाहेब शिंदे, शशांक कांबळे, अँड सिदार्थ इंगळे, यांच्यासह विविध सामाजिक राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल ‘मुंबई टेक विक 2026’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *