शरद पवार यांची अपेक्षा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे आठ-दहा दिवसांनी आम्ही बोलावून त्यातून मार्ग काढू

आज इंडिया आघाडीची मिटिंग आहे. आम्ही पुन्हा आठ दहा दिवसांनी प्रमुख लोकांना बोलवून त्यातून मार्ग काढू. मार्ग निघेल याची खात्री आहे. आजची आढावा मिटिंग आहे. या बैठकीत कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, असं सूत्र ठरवलं जाणार आहे. राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे या मिटिंगला गेल्या आहेत. संध्याकाळपर्यंत त्याचं आऊटकम कळेल. त्यानंतर दिल्लीत बसून त्यातून मार्ग काढून काम करू,असे शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, तीन वर्ष निवडणुका नाही. त्यामुळे जे हातात आहेत, त्या सर्वांना सोबत ठेवायचं आहे, कर्जमाफीच्या त्यात अटी आहेत. त्या अडचणीच्या आहेत. पण सरकार जेव्हा निर्णय घेतं तेव्हा त्याचं सूत्र लोकांना मान्य नसतं. पण सरकार निर्णय घेत असतं. अशावेळी लोकशाहीत सुसंवाद साधून त्यात दुरुस्ती करणं याची आवश्यक असतं. मी एवढेच सांगेल, असेही स्पष्ट केले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील संबंधित लोकांशी बोलून कर्जमाफीचा जो निर्णय घेतला, त्यातील अटी कशा दुरुस्त होईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे. कर्जमाफीच्या मुद्द्यात त्यात काही कमतरता आहे म्हणून तो फेकून द्या, ही भूमिका घेण्याची शक्यता नाही, असेही यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले की, माझ्याकडे रिपोर्ट आलाय. केळी आणि ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. तज्ज्ञांची एक टीम आम्ही पाठवली होती. वसंतदादा इन्स्टिट्यूटची त्याचा रिपोर्ट आला आहे. त्यांनी पाहणी केली. काय करायची गरज आहे, याचे लेखी निवेदन आमच्याकडे आलं आहे. शास्त्रज्ञ येऊन गेले. बघूया. ते काही आमच्या हातात नाही, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

रोहित पवार यांचा आरोप, भाजप सरकार आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटतायत सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल ते गंभीर आहे

सीईटी सेलचा मुद्दा आमच्याकडे देखील आला आहे. भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *