Editor

मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा २०, २१ फेब्रुवारीला

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तर व जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यासाठी आयुक्त, मृद व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत १९/१२/२०२३ रोजी या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून परीक्षा टी.सी. एस. कंपनीमार्फत, ऑनलाईन पद्धतीने २० व २१ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मिती प्रकल्पही महाबळेश्वर…

महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, बहुसंख्य हिंदू तर धार्मिक राजकारण कशासाठी?

राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनेही आता मराठवाडा, विदर्भात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका आणि सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच आज वर्धा येथील वंचितच्या जाहिर सभेसाठी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी संध्याकाळी सभेत पक्षाची भूमिका मांडण्याआधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार

पॅराग्लायडींग या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडींग प्री वर्ल्ड कप स्पर्धा-२०२४ बक्षीस वितरण प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस …

Read More »

भाजपाच्या अधिवेशनात नरेंद्र मोदी यांच्याकडून किमान डजनवेळा तरी काँग्रेसचे नाव

भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह देशभरातील भाजपाचे खासदार, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकिय नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना म्हणाले, मागील ६५-७० वर्षाच्या काळात काँग्रेसचा एकही पंतप्रधान …

Read More »

डॉ तानाजी सावंत यांची घोषणा, पंधरवड्यात १ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत १ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार …

Read More »

अरुणा इराणी, रविंद्र महाजनी, मिथुन चक्रवर्ती, हेलन यांनाही पुरस्कार जाहिर

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार येत्या गुरूवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व …

Read More »

शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेची चौथी फेरी चंदीगढ मध्ये

एकाबाजूला देशातील शेतकऱ्यांच्या कृषी मालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी या मागणीवरून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चलो दिल्लीचा नारा देत भारतीय किसन युनियन आणि इतर शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. केंद्रिय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात गुंग झाले आहेत. यापार्श्वभूमीवर …

Read More »

कोरोनानंतर आता पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या बँगवर मोदींचा फोटो

साधारणतः दोन वर्षापूर्वी संपूर्ण भारतासह जगभरात कोरोना विषाणूने हैदोस घातला. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून लसही बाजारात आली. मात्र या लसीकरणाच्या मोहिमेत देशातील गरिब व्यक्तींसाठी मोफत आणि विकत असे दोन प्रकार केंद्र सरकारने सुरु केले. मात्र पैसे विकत घेतलेल्या लस प्रमाणपत्रावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो या प्रमाणपत्रावर लावण्यात आला. त्यावरून …

Read More »

“सगेसोयरे” वर चार लाखांहून अधिक हरकती व सूचना

सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम २००० नियम २०१२ मध्ये ‘सगेसोयरे’ अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसुचना २६ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्याबाबत जनतेच्या हरकती/ सुचना मागविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाकडे १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अंदाजित सुमारे चार …

Read More »