Editor

अतुल लोंढे यांची टोला, अमितभाई, देशातील पहिले एम्स नेहरुंनी १९५३ साली सुरु केले मोदी-शहांना खोटे बोलणे व जुमलेबाजीशिवाय काहीच येत नाही

भारतीय जनता पक्षाचे नेते खोटे बोलण्यात पटाईत आहे. भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी व अमित शहा धादांत खोटे बोलतात व तोंडावर आपटतात. छत्तिसगडमधील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात मोदी सरकारच्या आधी एकही एम्स नव्हते अशी थाप मारली पण अमित शहा यांना माहित नसावे की पहिले पंतप्रधान पंडित …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्र आशियाई देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करणारे राज्य 'आसियान' देशांच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. भारत आणि आशियाई राष्ट्रांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करतानाच महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वर्षा निवासस्थानी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजदूतांचा आणि उच्चायुक्तांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन …

Read More »

मॅडम कमिश्नर प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती, १५ वर्षे झाली त्या प्रकरणाला पालकमंत्री असल्याने त्यांना एखादेवेळी बोलावले असेल

मागील काही दिवसात तत्कालीन पोलिस आयुक्तांनी जमिन हस्तांतरण प्रकरणी त्यांच्या पुस्तकात आरोप केल्याचे माझ्या वाचनात आले. पण तुम्हा सर्वांना माहित आहे की, मी माझे काम भले अन् मी भला अशा पध्दतीने आतापर्यंत काम करत आलो आहे. कोणी काही बोललो तर त्यावर मी प्रतिक्रियाही देत नाही. तसेच पुण्यातील त्या जमिन प्रकरणाशी …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी राज्यात बंदरे क्षेत्रात झपाट्याने विकास, गुंतवणूकदारांचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारासाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. येत्या काळात सागरी व्यापार क्षेत्रातही आघाडीचा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या हस्ते विविध उपक्रमांचे …

Read More »

पीएम किसानचा १५ वा हप्ता मिळण्यासाठी ही कामे करणे अनिवार्य अन्यथा खात्यात पैसे येणार नाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. शेतकऱ्याला प्रत्येक हप्त्यात २,००० रुपये दिले जातात. सरकार ४ महिन्यांत एक हप्ता जारी करते. पीएम किसान …

Read More »

ICICI बँकेकडून एफडी व्याजदरात सुधारणा इतके मिळेल व्याज

ICICI बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. नवीन व्याजदर १६ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. याशिवाय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणार्‍या गोल्डन इयर्स एफडीचा कालावधी वाढवला आहे. ICICI अर्थात आयसीआयसीआय बँक ७ ते २९ दिवसांत परिपक्व होणार्‍या एफडीवर ३.०० टक्के व्याजदर देत आहे. तर बँक पुढील ३० …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रला दुसऱ्या तिमाहीत ९२० कोटींचा नफा दुसऱ्या तिमाहीतही नफा

सप्टेंबरमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रचा निव्वळ नफा ७२ टक्क्यांनी वाढून ९२० कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने ५३५ कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा कमावला होता. व्याज उत्पन्नात वाढ आणि बुडीत कर्जे कमी झाल्याने बँकेचा नफा वाढला आहे. तिमाहीत बँकेचे …

Read More »

एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर दुसऱ्या तिमाहीत १५,९७६ कोटींचा निव्वळ नफा

एचडीएफसी बँकेने सोमवारी (१६ ऑक्टोबर) आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे (जुलै-सप्टेंबर) निकाल जाहीर केले. एचडीएफसी बँकेचा स्वतंत्र निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर तिमाहीत ५०.६ टक्के वाढून १५,९७६.११ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने १०,६०९५.७८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. दुसऱ्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ७८,४०६ कोटी …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकारीणीचा विस्तार: या नव्या नेत्यांची वर्णी मनोहर जोशींची नेतेपदी नियुक्ती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पडझडीनंतर उद्धव ठाकरे यांनी आज कार्यकारिणीत नेते, उपनेते आणि संघटक आणि सचिव अशा नियुक्त्या जाहीर यात अडगळीत पडलेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना नेतेपदी संधी देण्यात आली असून विस्तारात खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, रवींद्र वायकर आणि आमदार …

Read More »

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले. पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिराव फुले आणि …

Read More »