Editor

बिहारच्या जातनिहाय जणगणनेवर सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निर्णयः वाचा पाटणा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले

पाटणा उच्च न्यायालयाने नुकतेच बिहारमधील जातीनिहाय सर्वेक्षण वैध आणि योग्य क्षमतेने सुरू असल्याचा निर्णय देत या सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या. समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हे सर्वेक्षण केले जात असल्याची भूमिका बिहार सरकारची आहे. दरम्यान, याआधी न्यायालयाने या सर्वेक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. पाटणा उच्च …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांचा नाना करू नका…. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार याची निवडीनंतर अभिनंदनपर भाषणा दरम्यान मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

सध्याचे सुरु असलेले पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेते विना पार पडणार की काय अशी? शक्यता वाटत होती. त्यामुळे मी प्रत्येक वेळी त्यांना विचारयाचो की कधी येणार कधी येणार ? मी काही माझ्याकडच्या लोकांना नाही तर समोरच्या बाकावर बसलेल्या फ्रंटलाईनला बसणाऱ्या नेत्यांना विचारत होतो. विजय वडेट्टीवार हे मुळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते …

Read More »

मित्र ना.धों महानोर यांचे निधनः शरद पवार यांची मन हेलावणारी प्रतिक्रिया अखेर वृक्ष उन्मळून पडला

शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र तथा ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. आपल्या तरल काव्याच्या …

Read More »

दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी गैव्यवहार प्रकरणी चौकशी महसूल मंत्री विखे पाटील यांचे आश्वासन

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत चौकशी समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीत होत असलेला गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुनील टिंगरे, राहुल कुल यांनी उपस्थित …

Read More »

उरण येथील सिडको प्रकल्पग्रस्तांना ६ महिन्यांत भूखंड वाटपाची कार्यवाही पूर्ण करणार मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

रायगड जिल्ह्यातील उरण येथील प्रकल्पासाठी सिडकोने २८ गावांमधील ४५८४ हेक्टर जागा संपादित करण्याचा निर्णय घेतला. यापैकी १३४ हेक्टर जागा प्रकल्पग्रस्तांना देणे आवश्यक होते. १०४३ प्रकल्पग्रस्तांना १०२.९२ हेक्टर जागेचे वाटप करण्यात असून साडेबारा टक्के योजनेतंर्गत ५७५ प्रकल्पग्रस्तांना ३२.४२ हेक्टर जागेचे वाटप होणे बाकी आहे. अशा भूखंड वाटपाच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना साडेबारा …

Read More »

संभाजी भिडे व मणिपूर हिंसाचाराविरोधात चेंबूरमध्ये भीम आर्मीची आक्रोश रॅली विविध संघटनांचा सहभाग

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसह मणिपूरमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भीम आर्मी या संघटनेने उद्या गुरुवारी (३ ऑगस्ट )चेंबूर येथे दुपारी ४ वाजता आक्रोश रॅलीचे आयोजन केले आहे या रॅलीत ख्रिस्ती संघटनांसह विविध महिला व सामाजिक संघटनांचाही सहभाग असणार आहे . महात्मा ज्योतिबा फुले …

Read More »

आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनीची पूर्ण मालकी देण्यासाठी सरकार पुढाकार घेणार का? काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात विचारणा

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने कायदा करून आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनी दिल्या. आदिवासी बांधव त्यांच्या हक्काच्या जमिनीवर अतिक्रमित म्हणून राहात होते, तो ऐतिहासिक अन्याय यूपीए सरकारने दूर केला. मात्र त्या कायद्याप्रमाणे अनेक ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसत नाही, शिवाय आदिवासी बांधवांचे नाव इतर हक्कात येते, त्यामुळे त्यांना शेती कर्ज घेण्यात …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल, गुरुजीचा पुरावा आहे का, तर फडणवीस यांचे प्रत्युत्तर, तुमच्या नावात बाबा…. भिडे यास गुरुजी म्हणण्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये रणकंदन

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्षवेधी मुद्याच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. त्या लक्षवेधीवर निवेदन करताना देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख गुरुजी असा केला. त्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेत सदरहू व्यक्ती हा स्वतःला फर्ग्युसन …

Read More »

पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक मंत्री गुलाबराव पाटील याची माहिती

शासनाच्या सन २०२२ च्या शुद्धिपत्रकामुळे प्रदीर्घ काळ प्रशासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यास त्याच्या वयाच्या ५० वर्षानंतर सेवानिवृत्तीपूर्वी पदोन्नतीची संधी उपलब्ध होईल, हा हेतू साध्य झाला आहे. शासनाने सदर शुद्धिपत्रक हे व्यापक हीत लक्षात घेऊन काढलेले असून विभागीय परीक्षेतून सूट देण्याच्या शासनाच्या अनुषंगाने न्यायाधिकरणात दोन स्वतंत्र मागणीसाठी दोन मूळ अर्ज दाखल केले …

Read More »

कन्नमवारनगर, विक्रोळी येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्या इमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले होते, त्यानुसार म्हाडाकडे त्याबाबत आवश्यक त्या अधिमूल्याचा भरणा केला असून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. …

Read More »