अन्न व औषध प्रशासनाकडे ‘आरे’कडील कर्मचारी वर्ग वळवून दूध भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. सदस्य हरिभाऊ बागडे, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री विखे- पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात दूध भेसळ रोखण्यासाठी …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतला हा निर्णय मृत्यूनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नवीन पेन्शन
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देशातील प्रमुख राज्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्राचही विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत जून्या पेन्शनचा मुद्दा हा कळीचा बनला. त्यानंतर राज्यातील सर्व शासकिय-निमशासकिय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाची घोषणा देत संप सुरु केला. सुरुवातीला या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती, शेतकरी लाँग मार्चच्या ‘या’ मागण्या मान्य शेतकऱ्यांनी लाँग मार्च आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयां …
Read More »नाना पटोलेंचा टीका, सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भितीनेच मंत्रालयात लगबग सुरु सरन्यायाधिशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना सरन्याधीशांनी जी निरिक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले हे लांछनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहित असून सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणूनच काँग्रेसचे खासदार …
Read More »अजित पवारांचा खोचक टोला, ज्या-ज्या वेळी न्यायालयाने ताशेरे ओढले त्या-त्या वेळी… न्यायालयाच्या ताशेऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांच्याऐवजी मंत्र्यांनी सभागृहात उत्तर देताच विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले
राज्याच्या सहकारमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणामुळे मंत्रीमंडळातील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर न्यायालय ताशेरे ओढते हे महाराष्ट्राच्या गौरवशाली पंरपरेसाठी शोभनीय नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान मांडलेल्या या महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी …
Read More »धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठेयत विचारताच भाजपा आमदाराने उध्दव ठाकरेंचे नाव घेत… सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगला रंगला वाद
राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा संपत आला. मागील तीन आठवड्यात अनेकवेळा विरोधक वेगवेगळ्या विषयावरील प्रस्ताव मांडत असतात मात्र राज्य मंत्रिमंडळातील एकही मंत्री सभागृहात गैरहजर असल्याचे प्रसंग अनेक वेळा घडले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावणलेही त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर सभागृहात …
Read More »देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, उजनीसह या पाच मोठ्या धरणातील गाळ काढणार… विधान परिषदेतील चर्चे दरम्यान फडणवीसांची घोषणा
उजनीसह पाच मोठ्या धरणातील गाळ काढण्याच्या कामासाठी नव्याने समिती स्थापन करण्यात आली असून समितीमार्फत प्रारूप, निविदा, कागदपत्रे तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. येत्या एक दीड महिन्यात यासंदर्भातील मानके तयार करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासोबतच राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजना …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत ग्वाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते अजित …
Read More »अजित पवारांची मागणी, कच्च्या-बच्च्यांच्या जिवाशी खेळ, दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची… दूध भेसळीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक
राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे सामाज्र पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. दूध भेसळ करुन सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन …
Read More »देवेंद्र फडणवीसांची घोषणा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती विधानसभेत केली घोषणा
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये शासनाला सकारात्मक सूचना मिळाव्यात आणि येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढता यावा यासाठी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील निवडक सदस्यांची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सदस्य अमित साटम यांनी अंधेरी पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झोपडपट्टी …
Read More »
Marathi e-Batmya