शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशानावर नाशिक ते विधानभवनापर्यंत लॉग मार्च काढण्यात आला. हा मोर्चा सध्या मुंबईची वेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिंद येथे पोहोचला. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉंग मार्चचे नेते तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदारांना चर्चेसाठी पाचारण केले. या चर्चेत शेतकरी-कष्टकऱ्यांच्या सर्व …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश, इन्फ्लूएंझाग्रस्त रूग्णावर तातडीने उपचार करा वेळीच उपचार सुरु करण्याबाबत जनजागृती करावी
इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फ्लूएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजाराविषयीची आढावा …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, मराठा समाज आरक्षणासाठी पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार अधिवेशनानंतर दिल्लीत टास्क फोर्सची बैठक
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पूर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिल्ली येथे जाऊन वकिलांची टास्क फोर्स आणि संबंधित सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला मी …
Read More »नाना पटोलेंचा आरोप, कुर्ल्यातील भारत कोल कंपाऊड मधील उद्योग बंद करुन जागा बिल्डरच्या घशात उद्योग व कामगार वाचवा व भ्रष्ट बीएमसी अधिकारी, पोलीस आणि बिल्डरवर कारवाई करा
कुर्ला भागातील भारत कोल कंपाऊंड, काळे मार्ग, कमानी येथे १९६० पासून १०० पेक्षा जास्त लघु उद्योग करणारे गाळे असून कंपाऊंडच्या आसपासच्या परिसरात राहणारे अंदाजे ४५०० पेक्षा जास्त कामगार काम करत असून यावर २० हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु ही मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी बीएमसीच्या एल विभागातील अधिकारी व स्थानिक …
Read More »सरन्यायाधीशांच्या त्या मुद्यावर ठाकरे गटाचा युक्तीवाद, म्हणून राज्यपालांची बेकायदेशीर कृती… राजीनामा देणं बेकायदेशीर कृत्याचा परिणाम होता
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील अपात्र आमदारांच्या याचिकेवर आज सकाळी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिबल यांनी युक्तीवाद केल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि.वाय.चंद्रचूड यांनी तुम्ही म्हणता राज्यपालांचा निर्णय रद्द ठरवा आणि पूर्वीचे सरकार पुर्नःस्थापित करा. पण तुम्ही तर बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामाच …
Read More »नाना पटोलेंचा खोचक सवाल, राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल? बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्रींच्या वसईतील कार्यक्रमाला परवानगी देऊ नका
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित …
Read More »अखेरचा युक्तीवाद करताना कपिल सिबल यांचे आवाहन, जर मध्यस्थी केली नाही तर एकही सरकार… राज्यपालांचा तो निर्णय रद्द करण्याची केली मागणी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि अपात्रतेच्या निर्णयावर ठाकरे गटाची बाजू मांडण्यास कपिल सिबल यांनी काल सकाळपासून सुरुवात केली. मात्र काल राहिलेला अर्धवट युक्तीवाद कपिल सिबल यांनी आज पूर्ण केला. यावेळी बोलताना कपिल सिबल यांनी न्यायालयाच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देत म्हणाले, राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द …
Read More »त्या प्रकाशित वृत्तावर अजित पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचा खुलासा, मला व माझ्या कुटुंबियांना अडकविण्याचा… अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या एफआयआरवर फडणवीसांचा सभागृहात खुलासा
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका इंग्रजी वर्तमान पत्राचा दाखला देत अजित पवार यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गावदेवी मलबार हिल पलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालातील नेमकी माहिती काय असा थेट सवाल केला. अजित पवार यांच्या प्रश्नार्थक माहितीमुळे …
Read More »अजित पवार यांचा गंभीर इशारा, त्या विरोधात कडक भूमिका न घेतल्यास राज्याचे वाटोळे होईल अजित पवार यांचा गंभीर इशारा, कडक भूमिका न घेतल्यास राज्याचे वाटोळे होईल सामुहिक कॉपीसाठी टाकळी मानोरा दहावीचे परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार; कॉपी पुरविणाऱ्या जामावाकडून भरारी पथकावर लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला...
अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्याकाठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न …
Read More »शेतकरी-कष्टकरी रस्त्यावर तर उपमुख्यमंत्री आणि विधानसभाध्यक्ष गाण्यात दंग गायक स्व.मुकेश यांच्या कार्यक्रमाला विधानसभेचे कामकाज सुरु असताना आवारात करमणूक कार्यक्रमाचे आयोजन
राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल एकतर रस्त्यावर फेकून देत आहेत किंवा नागरीकांना फुकट वाटत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्येंच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई दरम्यान लॉगमार्च काढला असून हा मोर्चा मुंबईच्या …
Read More »
Marathi e-Batmya