Editor

मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला, तोंड लपवून पळणारा नाही….कृष्णेच्या का काठावर प्रायश्चित… लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता

पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहन रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर सभेत बोलताना विरोधी …

Read More »

या १०८ आदर्श आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा केला सन्मान गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

“विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत राज्य देशात अग्रस्थानी असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भारतातील याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल,” असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण कौशल्य विकास …

Read More »

शरद पवार यांची भाजपावर टीका, मी इतकी वर्षे भाजपावाल्यांना बघतोय पण त्यांची विधाने पोरकट एखाद्याच्या भाषणावर हरकत घेणे म्हणजे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न...

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांची भेट घेतली. युवा वर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जेव्हा पुण्यात भेट दिली, त्याचवेळी मुख्यमंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दोघांशी संवाद साधल्यानंतर …

Read More »

मासिक पाळी आल्याने सुट्टी द्याः सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, आम्ही निर्देश देऊ शकत नाही केंद्र आणि राज्य सरकारकडे जा सांगत याचिका फेटाळून लावली

सर्वोच्च न्यायालयाने नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान सुट्टी देण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सांगितले की, हा मुद्दा सरकारच्या धोरणाच्या कक्षेत येत असल्याने त्यावर इथे चर्चा होऊ शकत नाही. मासिक पाळीची सुट्टी देणे हा विषय केंद्र आणि …

Read More »

फडणवीसांच्या त्या दाव्यावर शरद पवारांचा खोचक टोला, ते तर मी चेष्टेत बोललो राष्ट्रपती राजवट उठविली गेली नसती तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का

मागील काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे नाव घेत त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच अजित पवारांसोबत शपथ घेतल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, जर त्यावेळी राष्ट्रपती राजवट उठवली गेली नसती तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का ? असे …

Read More »

उपमुख्यमंत्री, मंत्री मुंबईबाहेर मात्र प्रशासनाला अमृतच्या एमडी पदासाठी कोणाचा सतत फोन? अमृत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी विजय जोशी यांची नियुक्ती

एखाद्या महत्वाच्या पदाकरीता विशिष्ट व्यक्तीचीच निवड करावी यासाठी आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून शिफारस पत्र जाणे किंवा त्या कार्यालयातून एखाद्याने फोन करून शिफारस करणे आदी गोष्टी मंत्रालय आणि जिल्हास्तरीय प्रशासनात नव्या नाहीत. मात्र ओबीसी आणि बहुजन समाजाच्या शैक्षणिक कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या अमृत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी विशिष्ट …

Read More »

राज कपूर, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासह विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यापूर्वी राज कपूर जीवनगौरव आणि व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप ५ …

Read More »

महाराष्ट्रातील या १२ कलावंतांना राष्ट्रपती मुर्मुंच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित पद्मश्री दर्शना झवेरी यांचा ‘अकादमी रत्न सदस्यता’ ने सन्मान

संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील १२ कलावंतांचा समावेश आहे. पद्मश्री दर्शना झवेरी यांना मणिपूरी या नृत्यातील विशेष योगदानासाठी ‘अकादमी रत्न सदस्यता’ या संगीत अकादमीच्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित …

Read More »

जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ‘मिशन मोड’ वर राबवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसुली कामकाज जलद व पारदर्शी करण्यात यावे. जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत त्या ‘मिशन मोड’ वर राबवाव्यात. अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल प्रशासनाला दिल्या. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय …

Read More »

MPSC ने अखेर विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे माघार घेत केली मागणी मान्यचे ट्विट सुधारित परीक्षा योजना, अभ्यासक्रम २०२५ पासून

कोरोना काळापासून MPSC कडून जाहिर करण्यात आलेल्या सुधारीत परिक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयाविरोधात सातत्याने विरोध दर्शवित पुण्यात आंदोलन केले. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत MPSC प्रशासनाला विनंती करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार विनंती पत्रही देण्यात आले. तरीही याबाबतचा सुधारीत निर्णय …

Read More »