पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (५ फेब्रुवारी) सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून आवाहन केलं आहे. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं आवाहन राज ठाकरेंनी पत्राद्वारे केले. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या …
Read More »पुणे जिल्ह्यातील पोट निवडणूकीवरून अजित पवार म्हणाले, बिनविरोध होण्याचे कारण काय? पंढरपूर, कोल्हापूर, नांदेड येथील निवडणूक बिनविरोध झाली नव्हती
राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही उतरण्याची तयारी महाविकास आघाडीकडून करण्यात येत असतानाच आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला आवाहन …
Read More »दिल्लीत जन्मलेले पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन कारगिल युध्द आणि नवाज शरीफ यांच्या पदच्युत केले होते
जून्या दिल्लीत जन्मलेले आणि भारत-पाकिस्तान फाळणीच्या कालावधीत पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झालेले माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे दुबईतील एका रूग्णालयात आज निधन झाल्याची माहिती पुढे येत आहे. पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार स्थानापन्न असताना शरीफ यांचे सरकार उलथवून टाकत परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली. त्यानंतर भारत-पाक दरम्यान कारगिल युध्दासाठी …
Read More »भाग २: मेट्रो-६ प्रकल्प PAP घोटाळा पचविण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न पदमुक्त करा अन्यथा आमचा चार्ज काढून घ्या
मागील सात महिन्यापासून राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार एकनाथ शिंदे यांनी स्विकारल्यापासून हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, लोकांच्या मनातील सरकार असल्याचा दावा जाहिरपणे करत आहेत. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या वर्षभरात नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच होते. नगरविकास विभागाच्या अधिपत्याखालीच एमएमआरडीए येत असून प्रकल्पाधितांसाठीच्या सदनिका …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या स्थगित केलेल्या परिक्षा आता सोमवारपासून घेण्यात येणार विद्यापीठ प्रशासनाकडून जारी करण्यात आले प्रसिध्दी पत्रक
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रांवर सुरू होत्या. परंतु महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये बेमुदत संप पुकारल्यामुळे सदरच्या परीक्षा ३ फेब्रुवारीपासून स्थगित करण्यात आल्या होत्या. आता या सर्व परीक्षा ६ …
Read More »मुख्यमंत्री शिंदेची घोषणा, कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार भराडी देवीच्या यात्रेला पहिल्यांदाच गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
“आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज घेतले. …
Read More »सत्यजित तांबेंच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर, वेळेवर व योग्य असाच AB फॉर्म पाठवला सत्यजीत तांबेंनी वेळेवर अर्ज दाखल का केला नाही? शेवटपर्यंत ते कोणाची वाट पहात होते ?
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता, त्यामुळे सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्ष व एबी फॉर्म संदर्भात …
Read More »जयंत पाटील म्हणाले, गांधीजींच्या मंत्राचा केंद्राला विसर मात्र फडणवीसजी ती चूक करू नका माजी अर्थमंत्री म्हणून जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांना सुचवले गांधीजींचे विचार...
महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून राज्याचा आर्थिक कारभार सांभाळल्यामुळे आपल्या अनेक शंकांसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुढील मंत्र नक्कीच अंमलात आणावा असे विश्वासाने सांगू शकतो मात्र दुर्दैवाने केंद्रसरकारला त्याचा विसर पडला असून आपण ती चूक करू नये असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत देवेंद्र …
Read More »अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर सत्यजीत तांबे म्हणाले, मी भेटलो आणि त्यांना… माझी प्रामाणिक इच्छा होती की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून..
नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने मदत केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांना खुलासा करावा लागला तर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातच आज निवडणूकीतील विजयानंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत घेत …
Read More »आदित्य ठाकरेंची खोचक टीका, अर्थसंकल्प पालिकेचा की वर्षावरील कंत्राटदारांचा हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण कोणतीही करवाढ नसणारा आणि शिलकी अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी तब्बल ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावरून शिवसेनेचे आमदार आदिय ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि आयुक्तांवर टीका केली. तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी बनवलेला …
Read More »
Marathi e-Batmya