छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, परंतु या दैवताचा भारतीय जनता पक्ष वारंवार अपमान करत असून यातून भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे. राज्यापाल कोश्यारी, भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्यानंतर आता राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही महाराजांबद्दल गरळ ओकली आहे. सत्तेत असलेल्या आमदार व खासदार यांना छत्रपती शिवाजी …
Read More »मंगलप्रभात लोढांचा खुलासा, मी तर तुलना केली…
शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर …
Read More »उदय सामंत यांची घोषणा, वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी नि. न्यायाधीशामार्फत चौकशी
नुकतीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीने अनिल अग्रवाल यांना पत्र पाठविल्याचा पुरावाच जाहिर केला. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांताच्या अधिकाऱ्यांशी देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी बैठक घेतली आणि का घेतली असा सवाल करत या बैठकीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »लोढांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, उचलली जीभ लावली टाळ्याला
काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी केल्यानंतर जो वाद निर्माण झाला. त्याची राळ खाली बसत नाही, तोच भाजपाचे राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या घटनेची तुलना थेट शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून …
Read More »द काश्मीर फाईल्स चित्रपटाला व्हलगर म्हणणारे लॅपीड म्हणाले.. इतर ज्युरी
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात द काश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखविण्यात आल्यानंतर या महोत्सवाचे ज्युरी इस्त्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपीड यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाला व्हल्गर चित्रपट संबोधत कोणाच्यातरी सांगण्यावरून आणि प्रचाराचा (प्रपोगंडा) भाग म्हणून बनविल्याची टीका केली. यावरून भारतात द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे कलाकार अनुपम खेर व एका ज्युरींनी पत्रकार घेत परिषद …
Read More »नवाब मलिक यांना दिलासा नाहीच
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज ३० नोव्हेंबर मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पण, न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पीठासमोर मलिक …
Read More »गद्दारीचा किडा, मंगलप्रभात लोढा…;
गद्दारीचा किडा मंगलप्रभात लोढा… पन्नास खोके एकदम ओके… छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात त्यांच्याच मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात आले. भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने …
Read More »गोवरच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या लसीकरणावर भर
गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात बालकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे दिली. मंत्रालयात प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना माहिती दिली. डॉ. सावंत यांनी सांगितले …
Read More »साहित्यिक आणि समिक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक- समिक्षक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. साठोत्तरीच्या कालखंडात कविता, कथा, दिर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समिक्षा अशा …
Read More »कामगारांच्या कल्याणसाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांमध्ये चर्चा
राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाच्या सुरु असलेल्या तसेच नवीन योजनांवर राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे आणि उत्तर प्रदेशचे श्रम व रोजगार मंत्री अनिल राजभर यांच्यात चर्चात्मक संवाद झाला. यावेळी मंत्री राजभर यांनी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण योजना अनुकरणीय आहेत असे कौतुक करून खाडे यांना उत्तर प्रदेश …
Read More »
Marathi e-Batmya