जनाब संजय राऊत, महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या पुण्यातल्या सभेत केला, कदाचित आम्हा बहुजनांना आपण पण आपल्या सारखाच शकुनी काकाचा हुजऱ्या समजत असाल.. तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी …
Read More »मुख्यमंत्र्यांनी सांगितली, शाहु महाराज आणि प्रबोधनकारांच्या ऋणानुबंधाची आठवण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रम
प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो. आजोबांनी त्यांची जीवनगाथा लिहिली त्यात हे नातं नमूद केलं आहे. आज देखील शाहू महाराज कोल्हापूरात आहेत असं वाटतं. ते आपल्यातून जाऊन १०० वर्षे झाली हे जाणवत नाही. हा महामानव होता. शाहू महाराजांची केवळ २८ वर्षाची कारकीर्द. ४८ व्या वर्षी …
Read More »तर फडणवीस व पाटलांनी भाजपा खासदाराच्या “त्या” वक्तव्याचा खुलासा करावा राज ठाकरेंची उत्तर भारतीयांबदद्लची भूमिका महाराष्ट्र भाजपाला मान्य आहे का ?-अतुल लोंढे
लाऊडस्पिकरच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्यातील भाजपाने साथ दिली आहे आणि त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजपाचे उत्तर प्रदेश सरकार रेड कार्पेट स्वागत करण्यात मग्न आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंनी जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. आपल्याच पक्षाच्या …
Read More »कोरेगांव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवारांनी दिली प्रदीर्घ साक्ष म्हणाले… भाषण करावे पण प्रक्षोभक नसावे
चार वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरेगांव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित बांधवांवर स्थानिक उच्च जातीतील व्यक्तींना हल्ला करत दंगल घडवून आणली. या प्रकरणी एनआयएकडून स्वतंत्र तपास सुरु असला तरी राज्य सरकारकडूनही याचा स्वतंत्र तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज आयोगाने साक्ष नोंदविली. ही साक्ष …
Read More »विजय वडेट्टीवार म्हणाले, यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार ओबीसी प्रश्नावर बोलताना दिली माहिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नुकताच आला. मात्र त्या निकालात राज्य सरकारने केलेल्या कायद्याच्या अनुषंगाने किंवा घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने न्यायालयाने कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे यासंदर्भात पुर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात जावून आम्ही दाखल करणार नाही अशी माहिती ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार य़ांनी देत मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक …
Read More »मुख्यमंत्र्याबरोबरील बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ म्हणाले, राज्यात निवडणूका… पंतप्रधान यांनी लक्ष घालून ओबीसींचा प्रश्न सोडवावा- छगन भुजबळ
महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाही, महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. असे मत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केले. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक ही वर्षा या निवासस्थानी पार पडली. यावेळी महाविकास …
Read More »भाजपा खासदाराचा इशारा, राज ठाकरेंनी माफी मागितली तरच अयोध्येत प्रवेश परप्रातींयांच्या मुद्यावरून माफी मागण्याची
मागील काही काळात राजकिय क्षितिजावर काहीसे अदृष्य झालेल्या मनसेला पुन्हा पक्षाला सावरण्यासाठी मस्जिदीवरील भोंग्याचा विषय हाती घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न सुरु केला. याबरोबरच अयोध्येत जाणार असल्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या अयोध्या दौऱ्याला अद्याप अवकाश असला तरी भाजपाच्या खासदाराने राज ठाकरेंनी माफी मागितली तरच अयोध्येत प्रवेश …
Read More »मराठी साहित्य संमेलन घ्यायची इच्छा आहे का? मग या संकेतस्थळावर अर्ज करा अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून ०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. साहित्य संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या …
Read More »नवनीत राणा तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर झाल्या लीलावतीत दाखल पाठीच्या दुखण्यामुळे अॅडमीट झाल्याचे सांगण्यात येतेय
जवळपास १२ दिवस तुरुंगात राहील्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जामीन मिळाल्यानंतर एक दिवस उशीरांना त्यांची भायखळा येथील कारागृहातून सुटका झाली. त्यांनंतर थेट वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात जावून स्वतःची तपासणी करून घेतली. तुरुंगात साध्या पध्दतीने राहिल्याने त्यांना पाठीच्या दुखण्यात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या …
Read More »अजित पवार म्हणाले राज ठाकरेंना, अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या हुकूमशाही चालणार नाही, अल्टीमेटम कुणी द्यायचा नाही
अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या… कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अल्टिमेटमची भाषा …
Read More »
Marathi e-Batmya