Editor

सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला, आम्ही पाचच आहोत तरीही तीनशे तीनमध्ये गडबड… ओबीसी समाजाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरू

लोकसभेत आपल्या पक्षाचे खासदार सुनील तटकरे, अमोल कोल्हे व मी पूर्णपणे तत्पर आहोत. ओबीसी समाजाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरू असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी परिषदेत बोलत होत्या. ओबीसी आरक्षणाची घटना दुरुस्ती १९९४ साली पवारसाहेब मुख्यमंत्री असताना झाली. यानंतर कर्नाटकचे …

Read More »

शरद पवार म्हणाले, इथे कुणी फुकट काही मागत नाही… जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा यासाठी जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही

sharad pawar

इथे कुणी फुकट काही मागत नाही. जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा यासाठी जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ओबीसी अधिवेशनात आज मांडली. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडले. राज्यघटनेने एससी, एसटी समाजाला ज्या सवलती …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान, तिहेरी चाचणी काय ते सांगा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाचा धडक मोर्चा

ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्याचा निर्धार करून भारतीय जनता पार्टीने बुधवारी मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अटक करून घेतली. महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. वाचा चंद्रकांत पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा नाना पटोले …

Read More »

दुचाकीस्वारांनो; हेल्मेट वापरा नाहीतर लायसन्स रद्द मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा इशारा

helmet

दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणाऱ्याने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र अनेक दुचाकी स्वाराबरोबर मागे बसणाऱ्या व्यक्ती हेल्मेट घालत नसल्याचे मुंबई वाहतूक अर्थात ट्रॅफिक पोलिस दलाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे हेल्मेट न घालणाऱ्यावर कारवाईचा भाग त्यांचे ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द कऱण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यासंदर्भात मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी यासंदर्भात एक आदेश …

Read More »

नाना पटोले म्हणाले, तर भाजपाची नौटंकी… आरक्षणाप्रश्नी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा -

Nana Patole

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने मंत्रालयावर काढलेला मोर्चा हे निव्वळ ढोंग आणि नौटंकी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजपा सरकारने साथ दिली हे उघड सत्य आहे, …

Read More »

तुम्हाला माहित आहे का? मंत्रालय आणि जिल्हा परिषदेत किती पदे रिक्त आहेत २ लाख ४४ हजार ४०५ पदे रिक्त सर्वाधिक पदे गृह विभागाची रिक्त

Mantralay

राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील विविध विभागात आणि जिल्हा पातळीवरील जिल्हा परिषदांमधील विभागात किती पदे रिक्त आहेत याची माहिती सर्वसाधारणपणे कधी पुढे येत नाही. मात्र यावेळी पहिल्यांदाच राज्यातील विविध विभागात आणि जिल्हा परिषदअंतर्गत २.४४ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात माहिती कायद्यातंर्गत शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील …

Read More »

इम्पिरिकल डेटा जूनच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयात सादर मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणासह घेण्याची परवानगी मध्य प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यातच राज्य निवडणूक आयोगाकडून न्यायालयाच्याच आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली. यापार्श्वभूमीवर काहीही करून ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात इंम्पिरियल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ …

Read More »

कांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प महाप्रित कंपनी व इर्न्व्हामेंटल रिसर्च फौंडेशनचा पुढाकार

जैवविविधतेच्या दृष्टीने कांदळवनाचे (मॅन्ग्रोव्हस) महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि प्रकल्प मॅन्ग्रोव्ह सेल यांच्या संयुक्त विद्यमाने एक पथदर्शी प्रकल्प लवकरच होणार आहे. महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व इर्न्व्हामेंटल रिसर्च फौंडेशन यांच्या वतीने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या संबंधित इतर एजन्सींमधील समन्वय सुलभ होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक …

Read More »

राज्यसभेसाठी शिवसैनिकाचे नाव जाहिर होताच संभाजी राजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरु

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना उमेदवारी हवी असेल तर त्यांनी शिवबंधन बांधून घ्यावे आणि आपली उमेदवारी घेवून जावी असे आवाहन शिवसेनेकडून केले. तसेच शिवबंधन बांधून घेण्यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजी राजे यांना फोन करून निमंत्रण दिले. मात्र या निमंत्रणाकडे पाठ फिरवित राजेंनी थेट कोल्हापूर गाठले. परंतु राजेंचा …

Read More »

राज्यातील आदर्श अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या, अद्ययावत आणि होणार आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाचा लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार

राज्यातील आदर्श व स्मार्ट अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार होणार आहेत. त्यांचा कायापालट होण्यासाठी आणि आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाने लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आदर्श अंगणवाड्यांना अद्ययावत करून त्या अधिक अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार करण्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर …

Read More »