राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील डेंगळे पुलाजवळ अखिल ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ जाऊन अखिल ब्राह्मण महासंघाकडून मंत्रघोष करण्यात येत होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी …
Read More »राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. ही राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आवरावी, असे …
Read More »कोळशाच्या नावाखाली केंद्राचा राज्य सरकारला ६ हजार कोटींचा चुना राज्य सरकारने पाठविले केंद्राला पत्र
ऐन कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कोळसा कंपन्यांनी राज्य सरकारच्या मालकीच्या असलेल्या वीज निर्मिती केंद्राना कोळशाचा पुरवठा केला. मात्र कोळशाच्या नावाखाली कोळसा कंपन्यांनी दगड, कमी दर्जाचा कोळसा, निश्चित मेट्रीक टनापेक्षा कमी कोळसा, तपासणी न केलेल्या कोळसा आदी माध्यमातून राज्याच्या ऊर्जा विभागाला ६ हजार कोटी रूपयाहून अधिक किंमतीला चुना लावल्याची …
Read More »वाईन शॉपवाल्यांसाठी खुषखबरः विदेशी मद्याच्या विक्री परवान्यांसाठी आता नवीन दोन श्रेणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यात सिलबंद विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीच्या परवान्यासाठी क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते. यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या एफ.एल.-2 परवान्यांचे क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करुन विद्यमान परवानाधारकांना त्यांच्याकडील परवान्याची श्रेणीवाढ करण्यास …
Read More »काजूबोंडे, मोहाफुलेसह आता फळे आणि फुलांपासून तयार होणारे मद्य विदेशी वर्गात फळे, फुलांपासून मद्यार्क निर्मितीच्या धोरणास मान्यता
काजूबोंडे, मोहाफुले यांपासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी “देशी मद्य” याऐवजी “विदेशी मद्य” अशी करुन या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे “स्थानिक मद्य” निर्मितीच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते. काजूबोंडे व मोहाफुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणा-या मद्याचे वर्गीकरण हे २००५ पासून “देशी मद्य” असे …
Read More »जिल्हा वार्षिक योजनेतून मिळणार शाळांसाठी आता पाच टक्के निधी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती
राज्यातील शालेय शिक्षणाच्या सर्वांगीण विकासाकरीता नियोजन विभागाकडून जिल्हा नियोजन समितीस उपलब्ध होणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून किमान पाच टक्के निधी शालेय शिक्षणाशी संबंधित योजनांसाठी कायमस्वरूपी राखून ठेवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना अधिक सुविधा देणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी …
Read More »आता पुण्यातही होणार भुयारी मेट्रो राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना आज आणखी एक यश मिळाले असून पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-2ए) या ५.४६४ कि.मी. लांबी, ३ स्थानके असलेल्या रु. ३६६८.०४ कोटी प्रकल्प पूर्णत्व खर्चाच्या पूर्णत: …
Read More »फडणवीस सरकारपाठोपाठ आता ठाकरे सरकारकडून पुन्हा तिरूपतीला भूखंड नवी मुंबईतील उलवे येथील १० एकरचा भूखंड देवस्थानला
आंध्र प्रदेशातील प्रसिध्द अशा तिरूमला तिरूपती देवस्थानला अखेर १० एकर जमिन देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाची मोहोर उमटली आहे. विशेष म्हणजे फडणवीस सरकारच्या काळात बीकेसी सारख्या महागड्या भागात भूखंड दिल्यानंतर आता ठाकरे सरकारने पुन्हा एकदा तिरूपती देवस्थानला १० एकरचा भूखंड दिला आहे. विशेष म्हणजे तिरूपती देवस्थानच्या विश्वस्त पदावर शिवसेनेचे सचिव तथा …
Read More »सदावर्तेंचा गुन्हे महाराष्ट्र दौरा, सोलापूरातही गुन्हा दाखल यापूर्वी मुंबई, सातारा, कोल्हापूर आणि अकोल्यानंतर
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्लाबोल करत आंदोलन केले. या आंदोलनाचा कट एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या इशाऱ्यावर झाल्याच्या संशयातून त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर अटक केली. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर सातारा येथे दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी सातारा पोलिसांनी ताब्यात …
Read More »भाजपाने ‘महागाई’ च्या रुपाने जनतेला करुन दाखवले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची टीका
७० वर्षात जे झाले नाही ते आम्ही करुन दाखवू म्हणणार्या भाजपने महागाईच्या रुपाने जनतेला करुन दाखवले आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाला लगावला. देशात होलसेल प्राईज (WPI) महागाईने ३० वर्षात उच्चांक गाठला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आज महागाईमुळे …
Read More »
Marathi e-Batmya