जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यानंतर आता पंतप्रधान फुमियो किशिदा हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान किशिदा आणि मोदी यांनी संयुक्तरित्या प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. त्यावेळी पंतप्रधान किशिदा यांनी आगामी काही वर्षात भारतात ३.३ लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. १४ व्या …
Read More »एमआयएमच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस म्हणाली, तर आमचे… आघाडीचा कोणताही प्रस्ताव नाही: अतुल लोंढे
भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडी सोबत युती करायला तयार आहे. असे वक्तव्य एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. पण त्यांच्या पक्षाच्या गेल्या काही वर्षांच्या वाटचालीतून मात्र तसे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आपण भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे आणि मगच युती आणि आघाडीच्या बाबत चर्चा …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भाजपाचेच आमदार फोन करून सांगतायत आम्ही खुष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांचा टोला
राज्यातील महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल धुळवड खेळताना केला. त्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपाचेच आमदार आम्हाला फोन करून सांगतायत की फडणवीसांनी जेवढा विकास निधी …
Read More »पवार पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा पडळकरांना टोला
काही दिवसांपूर्वी भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, पवारांनी भर पावसात भाषण केले. पण संख्या ५४ जणच निवडूण आले. मागील २० वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री का नाही बसावला असा सवाल करत कितीही केले तरी राष्ट्रवादीची ताकद ५४ च्या पुढे जात नसल्याची टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी …
Read More »इम्तियाज जलील यांचा राऊतांना टोला, शिवाजी आणि संभाजी महाराज हे तुमची मक्तेदारी नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरून सुणावले
राज्यातील आगामी निवडणूकांच्यादृष्टीने एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने या प्रस्तावाला झिडकारले. त्यावरून इम्तियाज जलील यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना चांगलेच सुनावत म्हणाले की, भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आपले आदर्श …
Read More »एमआयएमच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले, त्यांनी सिध्द करावे… भाजपाची बी टीम नसल्याचे सिध्द करावे
देशातील सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीला अद्याप अवकाश असला तरी राज्यात निवडणूक आघाड्यांच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. एमआयएमने आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेनेने या युतीसंदर्भात झिडकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंत्यत सावध भूमिका मांडली असून याप्रश्नी बोलताना ते म्हणाले की, एमआयएमने आधी ते भाजपाची बी …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, हे सगळं भाजपाला घाबरून… सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी, निवडणूक प्रभारींची प्रदेशाध्यक्षांकडून नियुक्ती
राज्यातील विधानसभा निवडणूकीला अद्याप अडीच वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच महाराष्ट्रात नव्या राजकिय समीकरणांची जुळवाजुळवीच्या चर्चांना तोंड फुटले आहे. त्यातच एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिल्याने नव्या राजकिय समीकरणांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाला घाबरून या आघाडीच्या चर्चा सुरू झाल्याचा टोला महाविकास आघाडीला …
Read More »संजय राऊतांचा दानवेंना टोला तर एमआयएमच्या प्रस्तावावर म्हणाले… औंरगजेबाच्या कबरीसमोर झुकणाऱ्यांबरोबर युती नाही
राज्यात भाजपाला पराभूत करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, तृणमुलच्या नेत्या तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचे केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला युती करण्याची ऑफर दिली. मात्र एमआयएमच्या या ऑफरला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी झिडकारले …
Read More »एमआयएम खासदार जलिल म्हणाले, मते हवीत ना? मग या युती करा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला प्रस्ताव
२०१४ सालापासून एमआयएमकडून देशभरातील अनेक राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे करून निवडणूकीत उतरत आहे. एमआयएमला मिळणाऱ्या मतांमुळे काँग्रेससह अनेक पक्षांना विशेषत: बिगर भाजपातेर पक्षांना फटका बसत आहे. त्यामुळे एमआयएम पक्षावर भाजपाची बी टीम म्हणून आरोप केला जात आहे. यापार्श्वभूमीवर एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सगळं संपवायचेय ना? भाजपाला पराभूत …
Read More »जी-२३ नेत्यांच्या बैठकीनंतर आझाद सोनिया गांधींच्या भेटीला, भेटीनंतर म्हणाले… विरोधकांना पराभूत करण्यावर एकमत
पाच राज्यातील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर गांधी कुटुंबियांवकडून राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली. परंतु काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना पदावर कायम ठेवले. नेमके त्याच दिवशी जी-२३ च्या नेत्यांची गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर …
Read More »
Marathi e-Batmya