Editor

अखेर केंद्रीय अर्थ मंत्रालयाला आले भान: पेट्रोल-डिझेल इतक्या रूपयांनी स्वस्त पेट्रोल-डिझेलवरील करात केली कपात

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील ८ ते ९ महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज ३० पैसे ४५ पैशाने वाढ करत पेट्रोलच्या दराने ११० रूपयांचा टप्पा पार केला. तर डिझेलनेही १०० री पार करत महागाई वाढीला हातभार लावला. त्यामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला या भाव वाढीमुळे नागरीकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. …

Read More »

परमबीर सिंग म्हणतात, “आता मला काहीही माहिती देण्याची इच्छा नाही” ऑक्टोंबर महिन्यात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात परमबीर यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी वसूली करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगासमोर येवून कोणत्याही प्रकारची माहिती आणि पुरावे सादर करण्याची इच्छा नसल्याचे प्रतिज्ञा पत्र चांदिवाल आयोगाकडे सादर केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणात आपल्याला कोणाचीही उलट तपासणी किंवा …

Read More »

आत्महत्या करण्यास भाग पाडलेल्या राज्यमंत्री शंकरराव गडाखांना पदावरून दूर करा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबईः प्रतिनिधी महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, खंडणीखोरी, वसुली, आणि भ्रष्टाचारा संबंधातील आरोपांच्या सर्व मर्यादा पार करणाऱ्या ठाकरे सरकारच्या तोंडाला काळे फासणारी आणखी एक घटना नगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेल्या प्रतीक काळे नावाच्या युवकाने गडाख यांच्यावर आरोप करणारा व्हिडिओ जाहीर करून …

Read More »

काँग्रेस दाखल करणार किरीट सोमय्यांच्या विरोधात एक रूपयाची याचिका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्या विरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्या विरोधात कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

Read More »

सप्टेंबर तिमाहीत एसबीआयला ७६२७ कोटींचा नफा एसबीआय मार्केटच्या कॅपमध्ये वाढ

मुंबईः प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सप्टेंबर तिमाहीत ७,६२७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात ६६.७३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बँकेला ४,५७४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. निकालानंतर बँकेच्या शेअर्सचा भाव ३ टक्क्यांनी वाढून ५३२ रुपयांवर गेला. …

Read More »

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘या’ वेळी होणार शेअर बाजारातील व्यवहार ट्रेडिंग मात्र एक तासासाठी सुरु राहणार

मुंबईः प्रतिनिधी दिवाळीत शेअर बाजार बंद राहतील. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ट्रेडिंग एक तासासाठी असेल. यावेळी संवत २०७७ ची सुरुवात दिवाळीने होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणतेही नवीन काम किंवा गुंतवणूक शुभ मानली जाते. हिंदू परंपरेनुसार या दिवशी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग सत्रात गुंतवणूक करणे शुभ असते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीला शेअर …

Read More »

राज्यात तीस नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के लसीकरण करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना उद्दिष्ट्य

मुंबई : प्रतिनिधी विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. कोरोनाची साथ …

Read More »

अखेर किरीट सोमय्यांचा खोटेपणा अजित पवारांच्या वकीलांकडून उघड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही

मुंबई: प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जवळपास एक हजार कोटी रूपयांची मालमत्ता आयकर विभागाकडून सील करण्यात आल्याचे ट्विट भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत एकच खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर संध्याकाळी अजित पवार यांचे वकील अॅड.प्रशांत पाटील यांनी अशी कोणतीही कारवाई किंवा टाच आणण्यात आल्याचा खुलासा करत …

Read More »

भाजपाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना विजयी तर अशोक चव्हाणांनी राखली जागा दादरा-नगर हवेलीत कलाबेन डेलकर आणि देगलूर मध्ये जितेश अंतापूरकर

मुंबई: प्रतिनिधी दादरा-नगर हवेलीचे प्रशासकाकडून झालेल्या जाचामुळे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट मागे आत्महत्या केल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवार आणि स्व.मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी तब्बल ५० हजाराहून अधिक मताधिक्कांनी विजय मिळविला असून या निमित्ताने शिवसेनेने पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर आपले खाते उघडले. …

Read More »

आयटीकडून अजित पवारांची मालमत्ता सील: राष्ट्रवादी म्हणते मालमत्ता दुसऱ्याची किरीट सोमय्यांच्या माहितीवर नवाब मलिकांचे उत्तर

मुंबई: प्रतिनिधी मागील १९ दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या उद्योग आणि घरावर आयकर विभागाकडून सातत्याने धाडी टाकण्यात येत होत्या. या धाडीत १६४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड झाल्याचा दावा भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आज सोमय्या यांनी अजित पवारांशी संबधित जरंडेश्वर साखर कारखाना -६०० कोटी रूपये, दक्षिण दिल्लीतील फ्लॅट २० …

Read More »