मुंबई: प्रतिनिधी नोकरदारांच्या पगारातून दर महिन्याला पीएफ कापला जातो. आपल्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत हे अनेकांना माहीत नसतं. मात्र, याची माहिती तुम्हाला सहज मिळू शकते. ईपीएफओ ने आपल्या सदस्यांना त्यांच्या खात्यातील जमा रकमेची माहिती मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. एसएमएस, ईपीएफओ वेबसाईट, मिस्ड कॉल, मोबाइल अॅप …
Read More »उध्दव ठाकरें म्हणाले, शिडी करून पोहोचलेल्यांपासून हिंदूत्वाला धोका दसरा मेळाव्यात पंतप्रधान मोदींसह भाजपावर सोडले तोफगोळे
मुंबई: विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी कोणी तरी माहिती अधिकारात केंद्रीय गृह मंत्रालयाकडे विचारणा केली की, हिंदूंना धोका आहे का? म्हणून परंतु गृह मंत्रालयालयाने उत्तर दिले की असे काही नाही म्हणून. मग हिंदूना धोका नाही तर मग कोणापासून धोका आहे तर तो म्हणजे ज्यांनी हिंदूत्वाची शिडी करून जे सत्तेवर पोहोचले त्यांच्यापासूनच …
Read More »फोर्ब्सच्या वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर अहवालानुसार रिलायंसच बेस्ट कंपनी बेस्ट एम्प्लॉयर कंपन्यांची यादी जाहिर
मुंबई: प्रतिनिधी रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील बेस्ट एम्प्लॉयर (सर्वोत्तम नियोक्ता) कंपनी बनली आहे. फोर्ब्स बिझनेस मॅगझिनने जगातील बेस्ट एम्प्लॉयर कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला भारतात प्रथम स्थान देण्यात आले आहे. यासह रिलायन्सने जगात ५२ व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या यादीमध्ये जगातील …
Read More »आयटी क्षेत्रातील या कंपन्यात १.२० लाख नवीन नोकऱ्या इन्फोसिस, टीसीएस, विप्रोमध्ये बंपर भरती
मुंबई: प्रतिनिधी आयटी सेवा पुरवणाऱ्या देशातील चार मोठ्या कंपन्या या आर्थिक वर्षात १.२० लाख फ्रेशर्सची भरती करणार आहेत. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल कॉलेज कॅम्पस आणिइतर मार्गांनी भरती करतील. या भरतीत पहिल्या तिमाहीतील भरतीचा समावेश केला तर हा आकडा १.६० लाख होईल. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएलने १.२० …
Read More »जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण ही मोदी सरकारचे प्रचंड अपयश दर्शवणारी !: सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी विकासाची खोटी स्वप्नं दाखवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारची कामगिरी कोणत्याच क्षेत्रात उल्लेखनीय झालेली नसून सर्वच क्षेत्रात घसरण होत आहे. अर्थव्यवस्था, जीडीपी, रुपयाच्या घसरणीनंतर आता जागतिक भूक निर्देशांकातही भारताची घसरण झाली आहे. जगातील ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या स्थानावर आहे. ही घसरण मोदी सरकारचे प्रचंड अपयश दर्शवणारी आहे, अशी …
Read More »अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये राहणाऱ्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरिता रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. अ, ब आणि क …
Read More »विजयादशामिनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली ४५ हजार पोलिसांना ‘गुड न्यूज’ पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार
मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट …
Read More »एअर इंडियानंतर आता सरकारी मालकीच्या या कंपन्यांचे होणार खाजगीकरण १.७५ लाख कोटी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट
नवी दिल्ली: प्रतिनिधी एअर इंडियाची कमान टाटा समूहाकडे सोपवल्यानंतर आता केंद्र सरकार खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलेल. २०२१-२२ या आर्थिक वर्षात मोदी सरकार अर्धा डझनहून अधिक कंपन्यांचे खाजगीकरण किंवा निर्गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. सरकारने या आर्थिक वर्षात निर्गुंतवणूकीकरणातून १.७५ लाख कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले …
Read More »कोविडमुळे राहिलेला शब्द अजित पवारांनी केला पूर्ण: आमदारांना दसऱ्याचे गिफ्ट आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी: एक कोटींची भरघोस वाढ
मुंबई: प्रतिनिधी कोविड काळामुळे आलेल्या आर्थिक अडचणीमुळे रखडलेला आपला शब्द निर्बंधात दिलेल्या सवलतीं आणि आर्थिक बाजार सुरळीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी पूर्ण करत सणासुदीच्या ऐन तोंडावर आमदारांच्या विकास निधीत घसघशीत वाढ करत ४ कोटींचा करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील सर्व पक्षिय आमदारांना ही दसऱ्याची भेट ठरली …
Read More »आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्य अंधाराच्या खाईत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्य सरकार अंधाराच्या खाईत लोटले गेले असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारावर कारवाई करावी, अशी मागणीही उपाध्ये यांनी यावेळी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र …
Read More »
Marathi e-Batmya