Editor

मुख्यमंत्र्यांचे आवाहन, वाढदिवस सेलिब्रेशन नको पण मुख्यमंत्री सहायत्ता निधीत योगदान द्या राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा …

Read More »

चिपळूणकरांनी मांडली व्यथा… वाऱ्यावर सोडणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मात्र लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही-मुख्यमंत्री उध्व ठाकरे यांची स्पष्टोक्ती

चिपळूण (रत्नागिरी): प्रतिनिधी काल मी महाड येथील तळीये येथील दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली. आज चिपळूणमध्ये पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलोय. उद्या शक्य  झाले तर पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराची पाहणी करायला जाणार आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच सर्वकष नुकसान भरपाई जाहिर करणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट करत नुकसान …

Read More »

कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने दिला दिलासा पुन्हा होणार JEE-Main ची परिक्षा-शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि दरड  कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे ९ जिल्ह्यातील जनजीवनच विस्कळीत झाले. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी JEE-Main ची परिक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केली. यासंदर्भात त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. कोकण आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर, पालघर, …

Read More »

गाठीभेटीनंतर आता मराठा आरक्षणासाठी चव्हाणांचे सर्वपक्षिय खासदारांना पत्र आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहीम

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेत अशोक चव्हाण यांनी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्याबाबतचा ठराव संसदेत मांडावा यासाठी आग्रह धरला. त्यानंतर राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून …

Read More »

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला वेटलिफ्टींगमध्ये पहिले रौप्यपदक उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या ४९ किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. मीराबाई चानू यांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मिळवलेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूंना उत्तम कामगिरी …

Read More »

अतिवृष्टीचा फटका ८९० गावांना: जाणून घ्या कोठे किती मृत्यू आणि स्थलांतरीतांची संख्या अद्यापही ५९ अद्यापही बेपत्ता ७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई : प्रतिनिधी सततच्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी- रायगडसह ९ जिल्ह्यात झालेल्या पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ५९ नागरीक बेपत्ता आहेत. यापैकी सर्वाधिक नागरीत रायगड जिल्ह्यातील आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून ९ जिल्ह्यातील जवळपास ९० हजार नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने …

Read More »

आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण; तात्काळ पंचनामे करा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी  महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. …

Read More »

दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा आधार, “तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करणार असल्याची दिली ग्वाही

महाड (तळीये) : प्रतिनिधी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या तळीये गावावर काल अतिवृष्टीने दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० जणांना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. काल संध्याकाळपर्यंत जवळपास ३७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्यांखालून काढण्यात आले. त्यात  आज आणखी वाढ होवून ही संख्या ४० वर पोहोचली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज येथे आले. …

Read More »

कोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात जवळपास ४ आठवड्यानंतर पुन्हा ६ हजार ७५३ वर रूग्णसंख्या आली आहे. एक महिन्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र ही संख्या ६ हजाराहून खाली आलेली नाही. तसेच मुंबईतील रूग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून ३७३ इतकी रूग्ण संख्या आज नोंदविण्यात आली आहे. …

Read More »

दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत द्यायचीय तर या क्रमांकावर संपर्क साधा : या ठिकाणी कोसळल्या दरडी नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स, बिस्कीट, दूध पॉकेट, कपडे, चादर-बेड शीट, सतरंजी व इतर जीवन उपयोगी साहित्य स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योगपती व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पाठवावयाचे असल्यास माणगाव येथील पुढील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात …

Read More »