मुंबई : विशेष प्रतिनिधी मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याच्या मागणीवरून त्यांच्यावर 201 अन्वये खाली गुन्हा दाखल करून अटक करावी आणि पदावरून तात्काळ निलंबित करावे या मागणीवरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस तर विधान परिषदेत प्रविण दरेकर यांनी काल मंगळवारी मागणी लावून धरली. तसेच विधानसभेचे कामकाज …
Read More »बंजारा समाजाच्या तांड्यांना मिळणार महसूली गावांचा दर्जा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना व वस्त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात बोलत होते. औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्यातील जिंतूर …
Read More »आरोग्य विभागाच्या पदभरतीतील या पदांसाठी पुन्हा परिक्षा घेणार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची विधान परिषदेत माहिती
मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागातील ५४ संवर्गातील ३ हजार २७६ पदे भरण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ५१ संवर्गातील पदांचे निकाल घोषीत करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल. आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषीत करण्यात येणार नाही. ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …
Read More »अखेर भाजपाने निर्माण केली नवी सशक्त विरोधी पक्षाची प्रतिमा आव्हान महाविकास आघाडीसमोरील कि फक्त शिवसेनेसमोरील
मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील पाच वर्षात राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असताना राज्यात आणि केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज क्षीण राहीला. त्यामुळे अनेकवेळा विरोधक कुठे आहेत? प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात स्व. ग.प्र. प्रधान, स्व.एस.एम.जोशी यांच्यासह स्व.गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ सारख्या विरोधी पक्षनेत्यांची आठवण काढली …
Read More »माझी चौकशी करा ! फडणवीसांचे सरकारला खुले आव्हान दोनवेळा पुन्हा सभागृहाचे कामकाज तहकूब
मुंबईः प्रतिनिधी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच चौकशी करण्याचे सरकारला आव्हान दिले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच पंचाईत झाल्याने अखेर गोंधळातच पुढील कामकाज घेण्याची पाळी महाविकास …
Read More »हिरेन आणि डेलकर आत्महत्येवरून सेना-भाजपामध्ये रंगला सामना विधानसभेचे कामकाज तहकूब
मुंबई : विशेष प्रतिनिधी ॲटालिया इमारतीच्या जवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालक मनसुख हिरेन आणि दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपाचे सदस्य पहिल्यांदाच आमने-सामने आले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते …
Read More »केंद्राची स्पष्टोक्ती, आरक्षण कायदा करण्याचा अधिकार राज्यांना नाही मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : सचिन सावंत
मुंबई : प्रतिनिधी कोणत्याही राज्यांना आरक्षण कायदा करण्याचा अधिकार नसल्याची स्पष्टोक्ती सॉलिसिटर जनरल के.के.वेणूगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिल्याने राज्यातील मराठा समाजाला देण्याविषयीचा राज्य सरकारने केलेला कायदाच बेकायदेशीर ठरला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण आता मिळणार कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवेळी भारतीय जनता पक्षाच्या …
Read More »“त्या” प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याच्या डावामागे केंद्राच काळंबेरं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आरोप
मुंबई प्रतिनिधी ॲटांलिया बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी करत आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच बोलत “यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात. सरकार येतं तेव्हा यंत्रणा तीच …
Read More »महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पातून सर्वांचीच निराशा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून समाजाच्या सर्वच घटकांची निराशा झाल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील दोन लाखापेक्षा कमी कर्ज असणारे …
Read More »राज्याच्या तिजोरीत किती जमा आणि खर्च येणार तर तूट किती? वाचा केंद्राकडून ७० हजार कोटी न दिल्यास तूट वाढू शकते अशी भीती
मुंबईः प्रतिनिधी मागील वर्षात कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच वित्तीय केंद्रे बंद राहिली. त्यामुळे राज्याच्या महसूलात १ लाख कोटी रूपयांची तूट आली. तरीही यंदाच्या वर्षी ३ लाख ६८ हजार ९८७ कोटी रूपये अंदाजीत महसूली जमेचे उद्दिष्ट असलेला आणि १० हजार २२५ कोटी तर राजकोषीय ६६ हजार ६४१ कोटी रूपयांच्या तूटीचा आणि …
Read More »
Marathi e-Batmya