Editor

राज्यातील शिक्षण, आरोग्य आणि दळवळणासाठी खास निधी द्या कॉग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय वित्त आयोगाकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी केंद्रीय वित्त आयोगाच्या बैठकीत राज्याला केंद्राकडून मिळणा-या आर्थिक निधीबाबत काँग्रेस पक्षाचा दृष्टीकोन मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे शिष्टमंडळ आयोगाच्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींबरोबरच्या चर्चेच्या बैठकीत सहभागी झाले होते. आ. भाई जगताप व किशोर गजभिये हे ही यावेळी उपस्थित होते. …

Read More »

महाविद्यालयांकडून फि वाढविणार नसल्याचे पत्र घ्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची कुलपती आणि मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

मुंबई : प्रतिनिधी ‘स्वयं अर्थसहाय्यीते’चा (सेल्फ फायनांन्स) दर्जा प्राप्त झाल्यावर मनमानी पद्धतीने अभ्यासक्रमांचे शुल्क आकारणार्‍या अभियांत्रिकी संस्थांना चाप बसविण्यासाठी संस्थांना स्वयं अर्थसहाय्यतेचा दर्जा देतानाच संस्थांकडून थेट शुल्क न वाढविण्याचे नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विद्यापीठांचे कुलपती चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री …

Read More »

महसूल सचिवांचा विरोध तर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा घाट शासकिय जमिनी मालकी हक्काने देत सरकार २८ हजार कोटींवर पाणी सोडणार

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीत जमिन खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होते. परंतु या शासकिय जमिनी बिल्डरांच्यां फायद्यासाठी नाममात्र शुल्क आकारून मालकी हक्काने देण्याचा घाट राज्य सरकार कडून आखण्यात येत आहे. विशेष म्हणजे या नाममात्र शुल्क आकारणीचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून घालण्यात येत असून त्यास …

Read More »

अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केले स्वागत

मुंबईः प्रतिनिधी नवी मुंबईमधील अल्पसंख्यांक समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक, नसीम सिद्दीकी …

Read More »

अखेर त्या वक्तव्याप्रकरणी आमदार राम कदमांची बिनशर्त माफी महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची राज्य महिला आयोगाला हमी

मुंबईः प्रतिनिधी वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी आमदार राम कदम यांनी आपला खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडेकेला असून त्यानुसार त्यांनी आयोगापुढे बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच भविष्यात महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची हमीही दिली आहे. आमदार कदम यांच्या या खुलाशावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करु, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या …

Read More »

उत्तर भारतीयांनाही महाराष्ट्रात ओबीसींचा दर्जा द्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी यूपी, बिहार, मध्य प्रदेश येथे या समजाला ओबीसी मानले जाते. मात्र महाराष्ट्रात त्यांची आडनावे ही ओबीसीमध्ये येत नाही म्हणून त्यांचा समावेश ओबीसी मध्ये होत नाही. त्यामुळे  यूपी, बिहारमधील मुंबईत राहणाऱ्या या समजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागणी केल्याचे मुंबई …

Read More »

पर्यावरणाच्या रक्षणासाठी यंदा टिश्यु पेपर गणरायाची निर्मिती शाडू आणि पीओपीच्या गणरायाच्या मुर्तीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध

मुंबई : प्रतिनिधी ग्लोबल वार्मिंग आणि समुद्र, नदी-नाल्यांमधील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र या पर्यांवरणाच्या रक्षणासाठी विर्ले-पार्ले येथील संकेश रेणूके यांनी आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी माफक दरात टिश्यू पेपरपासून गणरायाची निर्मिती करून त्यास हातभार लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विर्ले-पार्ले येथील …

Read More »

मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा

औरंगाबाद :प्रतिनिधी मागील चार वर्षात सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी संजिवनी योजना, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, ऑरिक सिटी, मराठवाडा वॉटर ग्रीड अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शासनाने मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल सुरू केलेली आहे. मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडे नेण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड मोहीम येथे प्रभावीपणे राबविली. यापुढेही मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेने पुढे घेऊन …

Read More »

प्रकल्प अर्धवट सोडणाऱ्या विकासकांचे प्रकल्प म्हाडाने ताब्यात घ्यावे आमदार समितीची राज्य सरकारला शिफारस

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा इमारतींच्या पुर्नविकासाचे अनेक प्रकल्प सध्या रखडलेल्या अवस्थेत आहेत. तर या अनेक प्रकल्प विकासकांनी असेच सोडून दिलेले असल्याने विकासकांनी अर्धवट सोडलेले प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेवून त्याचा पुर्नविकास करावा अशी शिफारस मुंबई शहरातील पुर्नविकासाचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या आमदार …

Read More »

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नाराजांची भाजप नेत्यांच्या घरी गाठी-भेटी कृपाशंकर सिंह, राष्ट्रवादीचे जयदत्त क्षिरसागर भाजपच्या रांगेत

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. परंतु राजकिय क्षेत्रात यानिमित्ताने एका पक्षातील नाराजांनी सत्ताधारी पक्षातील वजनदार नेत्यांच्या घरी गाठ-भेटी घेण्याच्या मार्गाला लागले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने   यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेसचे नाराज नेते आणि अडगळीत पडलेले कृपाशंकर सिंह यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »